
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना ज्या थारमध्ये बसून फिरत होते. त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संकेत याची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयश याची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
संकेत नरेश चोंधे याच्यावरही वहिनीचा छळ केल्याचा आरोप आहे. संकेत हा यापूर्वी याच प्रकरणात अटकेत असलेला सुयश चोंधे याचा लहान भाऊ आहे. वीस लाख हुंड्यासाठी सुयश याच्या पत्नीचा छळ केला. तिने त्याच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्याचबरोबर या त्रासानंतर तिने महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. चोंधे कुटुंबीयांकडून छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर बावधन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चोंधे परिवाराच्या एकाही सदस्याला या प्रकरणात अद्याप अटक झालेली नाही.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर सुरू झालेल्या तपासामध्ये आत्तापर्यंत हगवणे यांना मदत करणाऱ्यांमधील आरोपी हे घरात अशाच पध्दतीने महिलांचा छळ करत असल्याची संतापजन माहिती समोर आली आहे. आपला शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार सुयश चौंधे याच्या पत्नीने केली आहे. नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे यांच्या विरोधात पोलिस आणि महिला आयोगामध्ये तक्रार केली होती. मात्र त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. चौंधे कुटुंबावर आरोप करणाऱ्या त्यांच्या सूनेने त्रासाला कंटाळू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. चौंधे कुटुंबातील सूनेने त्यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. आपली सासू काळी जादू करते, लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला आणि दोन तोळं सोनंही दिले होते. परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यातून आपल्याला मारहाण केली जाते, आपला छळ केला जातो, असे सूनेने तक्रारीत म्हटले आहे. नवरा सुयश चौंधे हा अश्लील व्हिडीओ दाखवून दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास द्यायचा. नवरा आणि दीर सासूसमोरच गांजा प्यायचे, असे त्या सूनेने म्हटले आहे. आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या चोंधे बंधूंकडे बावधन पोलिसांची चौकशी सुरू आहे. सुयश चोंधे याच्यावर पत्नीच्या तक्रारीवरून मंगळवारी (ता. 27) रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. बरेच दिवस हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. दरम्यान, सुयश चोंधे याचा भाऊ संकेत चोंधे (रा. भुगाव, ता. मुळशी) याने त्यांना मदत केल्याचे समोर आले. त्यांनी या दोघांना फिरायला थार कार दिली होती. पोलिसांनी ही थार कार जप्त केली आहे.
चोंधे बंधूची चौकशी सुरू असताना सुयश याच्या पत्नीने चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. सुयश याने फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी तिने बावधन पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार, सुयशवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. बावधन पोलिसांनी सुयश चोंधे याला नोटीस दिली आहे. सुयश चोंधे याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल आहे. तसेच, महिला आयोगाकडेही तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…
राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…
राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…
पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

