
बीड जिल्ह्यात किरकोळ कारणावरून दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या…
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना बीडमध्ये आता दुहेरी हत्याकांड घडले आहे. आष्टी तालुक्यातील वाहीरा गावात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पारधी समाजातील जमावाने हल्ला करत दोघांचा जीव घेतला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पारधी समाजातील तीन सख्खा भावांवर किरकोळ वादातून त्याच समाजातील जमावाने लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असे मृत पावलेल्या भावंडाची नावे आहेत. तर कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे काल रात्री आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
सांगली जिल्ह्यात टोळक्याने केली मध्यरात्रीच्या सुमारास पहिलवानाची निर्घृण हत्या…
पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…
जामखेडमध्ये बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू; पाहा नावे…
वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…

