स्मृती मानधनाचं मोडलं लग्न, पण तिनं एका वाक्यात जिंकली सर्वांची मनं…

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न मोडले आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.

सांगली येथे स्मृती मानधना हिचे लग्न काही मिनिटांवर असताना वडिलांना हार्ट अटॅक आला होता, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. स्मृतीसाठी हा मोठा धक्का होता. स्मृतीने त्यानंतर आपलं लग्न पुढे ढकलले. पण रविवारी अखेर स्मृतीने आपण या नात्यात कायम राहणार नसल्याचे सांगितले. स्मृतीसाठी हा वाईट काळ आहे. पण वाईट काळातही कसं सकारात्मक राहायचं, हे स्मृतीकडून शिकायला हवं. कारण लग्न मोडत असल्याची पोस्ट स्मृतीने केली, पण त्यामध्ये एक वाक्य असे लिहिले की, सर्व चाहत्यांची मनं तिने जिंकली आहेत.

स्मृतीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मला वाटते की आपल्या सर्वांचं एक ध्येय असतं आणि माझ्यासाठी ते ध्येय नेहमीच सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे राहिलं आहे. मला आशा आहे की मी भारतासाठी खेळत राहीन आणि देशासाठी बराच काळ ट्रॉफी जिंकत राहीन.” स्मृतीने यावेळी आपलं लक्ष यापुढे क्रिकेटवर केंद्रीत करणार असल्याचे म्हटले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ती या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडल्याचे दिसत आहे. आता देशासाठी ट्रॉफी जिंकण्याचा मानसही तिने व्यक्त केला आहे. चाहत्यांना स्मृतीची ही गोष्ट सर्वात जास्त आवडली आहे. त्यामुळे चाहत्यांनी स्मृतीला चांगला प्रतिसादही यावेळी दिला आहे. दरम्यान, स्मृती मानधनाने वाईट काळ अनुभवला आहे. पण तिने सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळेच चाहते तिच्यावर खूष झाले आहेत.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यात भांडण झाल्याचा दावाही सोशल मीडियाद्वारे करण्यात आला. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांकडून लग्न का मोडलं, याचे अधिकृत सांगितलेले नसले तरी पलाश मुच्छलच्या दुसऱ्या अफेअरमुळे स्मृतीसोबत लग्न मोडल्याचं बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!