मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन…

मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. संबंधित व्यक्तीने पोलिसांना फोन करून मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आज (रविवार) सकाळी हा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे. जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आज सकाळी हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी फोन करणार्‍याला कोणती ट्रेन, बॉम्ब कुठे ठेवला आहे, असे विचारले असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झाले. काही वेळाने फोन करणाऱ्याने त्याचा मोबाईल बंद केला. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!