
नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरलं; घरातील रॉडने हल्ला…
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन जणांची हत्या झाली असून, दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले आहे. सागर मसराम आणि लक्ष्मण गोडे अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.
सागर मसराम हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुन्या वादातून दोघांवर हल्ला करून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणात चंदू नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वसंतराव नाईक झोपडपट्टीमध्ये बुधवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सागर मसराम आणि लक्ष्मण गोडे या दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मृत्यू झालेले आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत, दोन वर्षांपूर्वी ते एकमेकांचे मित्र होते, पण आरोपी चंदू सागरविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यासोबत राहत नव्हता. 2 वर्षांपूर्वी भांडणाच्या वेळी मदतीसाठी बोलावले होतं, पण तो गेला नाही, त्याबद्दल मनात राग होता.
मृताचा अबू अझिज बेग नावाचा मित्र आहे, त्याच्याविरोधात कोर्टाने 302 मध्ये वॉरंट काढला होता, त्यानंतर पोलिसांनी बेगला अटक केली होती. अजिज बेग आणि आरोपींमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून अजिजला अटक करण्यात आली आहे, असा गैरसमज मृत झालेल्यांचा झाला होता. यानंतर ते आरोपीच्या घरी गेले आणि शिवीगाळ केली, यानंतर आरोपी चंदूने घरातील रॉडने सागर आणि लक्ष्मण यांच्या डोक्यावर हल्ला केला, यात दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ढाबा मालकाला बंदुकीच्या धाकावर लुटले…
नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…
नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…
नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…
नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

