Operation Sindoor: दहशतवादी मसूद अजहर याचं कुटुंबच संपलं, भाऊ, बहिणीसह 14 जणांचा खात्मा…

कराची (पाकिस्तान): भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर बुधवारी (ता. ७) मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताच्या या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहर याचे आख्खं कुटुंब संपल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केले आहे. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

दहशतवादी मसूद अझहर याने भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी भूमिका बजावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर

2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर

3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर

4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी

5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर

6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.

7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर

8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर

9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर

दरम्यान, भारतीय सैन्याने बुधवारी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक आणि मर्यादित हल्ले केले. ही कारवाई पूर्णपणे गैर-प्रक्षोभक होती आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला लक्ष्य केले गेले नाही. हल्ले त्या ठिकाणी झाले जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती. सैन्याच्या एक्स (X) हँडलनुसार, हे ऑपरेशन केवळ 23 मिनिटांत पार पडले. पहाटे 1:28 ते 1:51 दरम्यान पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाले. अखेर सैन्याने 1:51 वाजता पुष्टी केली की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील ‘न्याय झाला.’

Operation Sindoor Time Line :
1:28 AM: इंडियन आर्मीच्या अधिकृत हँडल ADGPI ने ट्विट केले: प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः। (प्रहारासाठी तत्पर, विजयासाठी प्रशिक्षित.) हे ऑपरेशनच्या सुरुवातीचे संकेत होते.
1:28 AM ते 1:51 AM दरम्यान: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्फोट झाले. विशेषतः मुजफ्फराबादसारख्या भागातील स्थानिक लोकांनी ग्रीड स्टेशन्सवर क्षेपणास्त्र हल्ल्यांविषयी सांगितले. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण होते.
1:51 AM: सैन्याने दुसरे ट्विट केले: #PahalgamTerrorAttack Justice is Served. Jai Hind

‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…

Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…

Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…

Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…

मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…

भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…

Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…

काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…

पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!