पुणे जिल्ह्यात मित्राने चाकूने सपासप वार करत केली हत्या…

पुणे : चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे एका मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.

किशोर सुरेश राणे (वय २५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी (ता. ११) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. किशोर आणि त्याचा मित्र कपिल जितेंद्र कोसलकर हे दोघे एकत्र असताना त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, कपिलने जवळ असलेल्या धारदार चाकूने किशोरवर हल्ला चढवला.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आरोपी कपिलने अत्यंत निर्घृणपणे किशोरच्या छातीवर आणि जबड्यावर घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किशोरला आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र, जखमा खोल असल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान किशोर राणे यांचा मृत्यू झाला.

आरोपी कपिल कोसलकर हा या घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. योगेश दत्तात्रेय नाणेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण दक्षिण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Morya Misal (@moryamisal)

पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

पुणे जिल्ह्यात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पत्नीची हत्या…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…

पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!