पुणे जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला; मृतांमध्ये दीड वर्षांचे बाळ…

शिरूर, पुणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. महिलेसह दोन चिमुकल्यांना जाळून क्रूर हत्या करण्यात आली असून, शिरूर तालुका हादरला आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे खून करून त्यांचे मृतदेह पेटवून दिल्याचे समोर आले आहे. लहानग्या बाळांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना गहिवरून आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील अहिल्यानगर हायवेजवळ, ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस हे तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र, प्राथमिक तपासणीत मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले (tattoo) असल्याचे पोलिसांना आढळले आहे. या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हे हत्याकांड कोणी आणि कोणत्या कारणावरून केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांजणगाव पोलिस स्थानकाकडून परिसरातील नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे असे कोणी भाडेकरू किंवा ओळखीत व्यक्ती बेपत्ता आहेत, त्यांनी तात्काळ रांजणगाव पोलिस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी असे, आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार…

पुणे जिल्हा हादरला! नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग…

धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक…

पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!