
आपण यांना कोठे पाहिलेत का? संपर्क साधण्याचे आवाहन…
पुणेः सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे ५ जुलै रोजी घरातून कामानिमित्त बाहेर पडले असून, अद्याप घरी आलेले नाहीत. याबाबतची माहिती शिरवळ (जि. सातारा) पोलिस स्टेशन येथे देण्यात आली आहे. सुनिल कुलकर्णी यांना आपण कोठे पाहिले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे रविराज पॅलेस, पळशी रोड, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा येथे राहण्यास आहेत. घरातून कामानिमित्त कोल्हापूर येथे जाण्यासाठी ५ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता बाहेर पडले आहेत. पण, अद्याप ते घरी आलेले नाहीत.
वर्णन पुढीलप्रमाणेः
रंग गोरा, बांधा मध्यम, उंची ५ फुट, अंगात हिरव्या रंगाचा लाईनिंगचा फुल बाहेचा शर्ट, काळे रंगाची पॅन्ट, पायात मरून रंगाची चप्पल, स्वभाव शांत, उजव्या कानाने कमी ऐकू येते. दाढी-मिशा नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा समजतात.
सुनिल रामकृष्ण कुलकर्णी यांना आपण कोठे पाहिले असल्यास ९२८४२९३२३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबियांनी केले आहे.
IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…
पोलिस भरती! सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे मायक्रो प्लॅनिंग…
सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख एक धाडसी अधिकारी…
लोणीत घरफोडी केलेल्या गुन्हेगारास सातारा पोलिसांनी केली अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

