
धक्कादायक! संशयावरून मुलींच्या डोळ्यांदेखत पतीने चाकूने चिरला पत्नीचा गळा…
नवी दिल्ली : पतीने संशयावरून दोन मुलींच्या देखत पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना जाफराबादमध्ये घडली आहे. निशा (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे तर आरोपी पती साजिद याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जाफराबादच्या मौजपूरमध्ये एकाने आपल्या पत्नीवर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता महिला गंभीर जखमी होती. तिला जीटीबी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत महिलेचं कुटुंब मौजपूरच्या विजय मोहल्ला येथील गल्ली क्रमांक 3 मध्ये राहते. मृत महिला निशाच्या मानेवर, छातीवर आणि डाव्या हातावर वार केले होते. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. साजिद आणि निशा यांना दोन मुली असून त्यांचे वय 11 आणि 07 वर्षे आहे.
घटनेच्या वेळी दोन्ही मुली घरी हजर होत्या. आईवर हल्ला होत असल्याचे पाहून दोन्ही मुलींनी आरडाओरडा करत होत्या. वडिलांना आईवर हल्ला न करण्याची विनंती केली. पण, आरोपी साजिद संतापला. त्याची पत्नी निशा ओरडत राहिली आणि तो तिच्यावर चाकूने वार करत राहिला. यादरम्यान मोठ्या मुलीने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या हातालाही गंभीर दुखापत झाली.
आरोपी काही दिवसांपूर्वी मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवत होता. मात्र, नंतर त्यानी ते दुकान बंद केले. सध्या तो बेरोजगार आहे. आरोपीला संशय होता की त्याची पत्नी निशा त्याला धोका देत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…
दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…
संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची ‘अग्निपरीक्षा’, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…
काँग्रेस नेत्याची भररस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या…
नवऱ्याच्या अनैतिक संबंधावरून कार्यालयातच चपलेने धुलाई…