पुणे शहरात दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; दोन युवकांचा मृत्यू…

पुणे: पुणे शहरातील कोथरूडच्या सावरकर पुलाच्या कठड्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दोन युवकांची दुचाकी आदळली. यावेळी झालेल्या अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे.

कोथरूडमधील पौड फाट्याजवळील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. पुलाच्या कठड्यास धडकून दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पहाटे तीनच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत सर्वेश गोपाळ पाटील (वय 20) आणि पुष्कर सुधाकर चौधरी (वय 19, रा. तुरक गुप्हाडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

सर्वेश पाटील हा त्याचा मित्र पुष्कर चौधरी याच्यासोबत दुचाकीवरून स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावरून जात होता. दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि ती थेट पुलाच्या कठड्यावर धडकली. जोरदार धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले.अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कोथरूड पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…

पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…

पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; युवतीला होणारा नवरा नव्हता पसंत…

पुणे! चहाच्या टपरीवर सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोष पहिल्याच दिवशी होरपळून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!