शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींना सहा तासात अटक करून मुद्देमाल केला जप्त…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात जबरी चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपींना शिवाजीनगर पोलिसानी सहा तासात अटक करून गुन्हयातील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी सोनाली प्रशांत काकडे (वय-३०, व्यवसाय- नर्स, रा- दुसरा मजला, इंदीरा कॉम्प्लेक्स, सदानंदनगर, मंगळवारपेठ पुणे) यांनी १६/१२/२०२३ रोजी तक्रार दिली की, ‘मनपा बस स्टँड येथून पुणे स्टेशनकडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जात असताना पाठीमागुन स्कुटरवर अंदाजे २०-२५ वर्षांचे दोन अनोळखींनी येवून त्यांचे हातातील काळी पर्स बळजबरीने हिसकावुन चोरी करुन नेली” म्हणून त्याबाबत शिवाजीगनर पो.स्टे गु.र.नं. २५४ / २०२३, भा. द. वि. कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर दाखल गुन्हयातील नमुद अनोळखींचा तपास चालू असताना शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी पोलिस उप निरीक्षक प्रताप साळवे, पोलिस अंमलदार पोहवा. ९४७ पवार पो.शि. ४५९२ दडस यांनी समांतर तपास चालु केला. पो. शि. ४५९२ दडस यांना सीसीटीव्ही फुटेजचे आधारे व त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की १५/१२/२०२३ रोजी मनपा येथे महिलेला लुटणारे अनोळखी हे जुनी कामगार पुतळा वसाहत, शिवाजीनगर येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने ती बातमी त्यांनी तपासपथकाचे प्रभारी पोलिस उपनिरिक्षक प्रताप साळवे यांना सांगतलेने त्याची खात्री करुन मिळालेली बातमी पो.उ.नि. प्रताप साळवे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना सांगुन त्यांचे आदेशाप्रमाणे व सहा. पोलिस आयुक्त वसंत कुवर, संदीपसिंह गिल्ल, पोलिस उप-आयुक्त परि-२, प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रा. विभागाचे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उप-निरीक्षक प्रताप साळवे, पोलिस अंमलदार पोहवा. ९४७ पवार, पोहवा. ७८३० शेख, पोहवा. ६६४५ काळे, पो. शि. ४५९२ दडस यांनी दोन टिम करुन जुनी कामगार पतळा वसाहत येथील पुलाचे मागे पुढे सापळा रचला.

एका अनोळखीसह टीव्हीएस गाडीसह थांबलेला असल्याचे दिसल्याने वरील स्टाफचे मदतीने १६/१२/२०२३ रोजी १५/२५ वा. त्यास जागीच पकडला. आदित्य विजय शिंदे (वय-२१ वर्षे, रा-करपे वाडा, सोमवारपेठ, पुणे) व गणेश चंद्रकांत कवडे (वय-१९ वर्षे रा-सदानंदनगर, तिसरा मजला, फ्लॅट नं- ३२५, मंगळवार पेठ, पुणे) दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडे सदर दाखल गुन्हयाबाबत तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील वापरलेली स्कुटर ही सुध्दा आरोपींकडुन जप्त करुन हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा कौशल्यपर्ण तपास करुन गुन्हा दाखल झाल्यापासुन सहा तासाच्या आत आरोपी पकडून त्यांना गुन्हयात अटक केली व गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मुद्देमाल व वापरलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील असल्याने अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच नमुद गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सचिन तरडे हे करीत आहेत.

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकडून चार मोटारसायकली केल्या जप्त…

शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हेगारावार एमपीडीए अंतर्गत कारवाई…

आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…

बदला! मंगला टॉकिजसमोर घडलेल्या खुनप्रकरणी चौघांना अटक; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!