पुण्यातील सराईत गुंड टोळीतील सक्रिय गुन्हेगार गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): पुण्यातील सराईत गुंड विशाल उर्फ जंगळ्या सातपुते टोळीतील सक्रिय गुन्हेगार अजिंक्य शिंदे याला घरपोडीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद आहे.

दिनांक ०५/०८/२०२३ रोजी पुणे शहर हद्दीतील पाहिजे/फरारी/मोक्का/तडीपार आरोपींचा शोध घेणे कामी पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करताना पथकातील पोलिस अंमलदार ८७४२ महेश पाटील व १००१९ सुमित ताकपेरे यांना बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, लष्कर पो.स्टे. कडील गुन्हा र.नं. २१/२०२३, भा दं वि कलम ३८०, ४५७ या दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी त्याच्या राहत्या घराच्या पत्त्यावर येणार आहे.

सदर बातमीची खात्री झाल्यावर पथकाचे प्रभारी वपोनि अशोक इंदलकर यांना कळविले असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तात्काळ पुढील कारवाई करणे बाबत मौखिक आदेश दिला. प्राप्त बातमीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले व अधिक माहिती घेण्यासाठी इकडील कार्यालयात आणून विश्वासात घेतले असता आरोपीने त्याचे नाव अजिंक्य सुरेश शिंदे (वय 24 वर्षे, रा. लोहिया नगर, पुणे 42) असे सांगून सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी लष्कर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, घातक धारदार शस्त्रास्त्रे बाळगणे, NDPS act प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, पोलिस उप आयुक्त गुन्हे, सुनील तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे 1, सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे 2 व प्रभारी अधिकारी अशोक इंदलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ढगे ताकपेरे, पाटील यांनी केली आहे.

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…

पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…

पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना युनिट २ने केले जेरबंद…

पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!

इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!