हलक्या काळजाचे असाल तर यष्टिका आचार्य हिचा जिममधील Video पाहू नका…

बिकानेर (राजस्थान): वेटलिफ्टिंगची राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्य हिचा जिममध्ये सराव करताना मृत्यू झाला आहे. संबंधित व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. त्यामुळे तुम्ही हलक्या काळजाचे असाल तर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहू नका. यष्टिका आचार्य (वय १७) हिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बिकानेरची महिला पॉवर लिफ्टर यष्टिकाचा 270 किलो वजनाचा रॉड मानेवर पडल्याने तिचा मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे जिममध्ये सराव करताना ही दुर्घटना घडली. यशिका नेहमीप्रमाणे प्रशिक्षकाच्या उपस्थितीत सराव करत होती. मात्र, तिच्या मानेवर रॉड पडल्याने ती बेशुद्ध झाली. तिला जिममध्येच प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

ट्रेनर यष्टिकाला वेट लिफ्टिंग करायला लावत होता, तो आधी म्हणाला एक… दोन… तीन… म्हणाला अन् त्यानंतर यष्टिकाने वजन उचलले. मात्र संपूर्ण भार तिच्या मानेवर पडल्याने तिला काहीही सुचलं नाही. यष्टिकाला भार सांभाळता आला नाही अन् ती खाली पडली. तिच्या मानेवर 270 किलोचा वजनी बार पडला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याने बिकानेरच्या क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही काळापूर्वी यष्टिकाने गोव्यात झालेल्या 33 व्या राष्ट्रीय बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये सुसज्ज गटात सुवर्णपदक आणि क्लासिक प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. तिची दुसरी बहीण देखील पॉवर लिफ्टिंग करते. यष्टिका यांच्या मृत्यूबाबत कुटुंबाने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तथापि, पोलिस त्यांचा तपास करत आहेत.

Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…

हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…

Video: उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन् गेला जीव…

Video: महिला प्राध्यापिकेने वर्गातचं केलं विद्यार्थ्याशी लग्न…

Live Video: पोलिस आयुक्त पडले बेशुद्ध अन् राज्यपालांवर उठली टिकेची झोड…

Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!