पुणे! काळेपडळ पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काळेपडळ पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार फैजान रमजान ऊर्फ कादर शेख ऊर्फ पच्चीस याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

काळेपडळ पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी सुचीत केले होते. यातील फिर्यादी हे २६/०१/२०२५ रोजी रात्री ०१.०० वा. सुमारास दुचाकी गाडीने जात असताना सदर ठिकाणी रस्त्याच्या बाजुला उभे असलेल्या तीन जणांना जवळ जेवणा बाबत चौकशी करत असताना एका ने फिर्यादीस जोरात त्याच्या हातामध्ये घातलेल्या कडयाने कानावर मारले व त्यामुळे कान सुन्न झाला. तसेच पच्चीस याने मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मारहाण करत शिवीगाळ केली व त्याच्याकडील धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या ताब्यातील दुचाकी गाडी बळजबरीने हिसकावून पळवून नेली. वगैरे तक्रार दिल्याने त्याचे विरुध्द काळेपडळ पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं. ०६/२०२५ भा.न्या.सं.कलम ३०९ (६), ३५२, ३५१ (२), फौजदारी कायदा सुधारणा कलम ३,७ शस्त्र अधिनियम कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काळेपडळ पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार फैजान रमजान ऊर्फ कादर शेख ऊर्फ पच्चीस (वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर १२/ए, सय्यदनगर महंमदवाडी पुणे) याचा शोध घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करुन गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला तसेच त्याचेवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, मारामारी, दहशद निर्माण करणे असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असुन, सदर आरोपीवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.

फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस (वय २० रा. गल्ली नं. १२ए सय्यदनगर महम्मदवाडी रोड हडपसर पुणे) हा वांरवार गुन्हे करुन, समाजासाठी धोकादायक व्यक्ती असल्याने, सदर सराईत गुन्हेगार यांच्या विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन, त्यावर एमपीडीए कायदयान्वये कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्त यांचे कार्यालयात सादर केला असता पोलिस आयुक्त यांनी सराईत आरोपी फैजान रमजान ऊर्फ कादर शेख ऊर्फ पच्चीस हा व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणा या कृत्यांपासून परावृत करण्याचे दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलावृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळूची तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा
घालण्याबाबतचा अधिनियम १९८१) (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक रोमन ५५) (दुरुस्ती २००९) (दुरुस्ती २०१५) मधील कलम ३(२) अन्वये स्थानबध्द कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस स्टेशन, पुणे शहर, अमर काळंगे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक, अमित शेटे, पो.हवा. २०६४ काळभोर, पो.हवा ७७७४.कांबळे, पो.हवा ६५७ लाहिगुडे, पोलिस अंमलदार ८३०२ सुर्यवंशी, पोलिस अंमलदार १००७० तांबोळी, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

www.puneganpati.com

पुणे! पाकिस्तानला पाठिंबा देणारी विद्यार्थिनी अटकेत; कोर्टात ‘डुप्लिकेट’ ड्रामामुळे खळबळ…

पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…

पुणे हादरलं! नवऱ्याने चिमुकल्यासमोरच केली पत्नीची हत्या अन् मृतदेह दुचाकीवर घेऊन…

पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!