हृदयद्रावक! शिक्षकांचा संप अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जागेवर जीव…

कोल्हापूर: उजळाईवाडी (ता. करवीर) येथे शेजारच्या घरावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुलाचा उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी घडली. अफान असिफ बागवान (वय 13) असे मृत मुलाचे नाव आहे.

अफान असिफ बागवान हा शाळेला सुटी असल्याने मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला. खेळताना चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीवर गेला. असिफ चेंडू आणण्यासाठी टेरेसवर गेला असता घराच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा त्याला संपर्क होताच जोराचा विद्युत धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अफानला शिक्षकांच्या सुरू असलेल्या संपामुळे शुक्रवारी शाळेला सुट्टी होती. त्याचा मित्रासह खेळत असताना क्रिकेटचा चेंडू शेजारील घराच्या छतावर गेला. चेंडू आणण्यासाठी तो वर चढला असता घराच्या अगदी दीड ते दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारेला त्याचा संपर्क आला. क्षणात प्रचंड विजेचा धक्का बसल्याने तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. वडील औद्योगिक वसाहतीत कामगार आहेत, तर आई गृहिणी. दोन बहिणीनंतर तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. अत्यंत मनमिळावू, हुशार आणि अभ्यासू स्वभावामुळे मोहम्मद सर्वांच्या आवडीचा होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने आई-वडील, कुटुंबीय आणि मित्रांचे अश्रू अनावर झाले. या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पुणे! युवतीने 9व्या मजल्यावरून घेतली उडी; हृदयद्रावक चिठ्ठी…

हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरनं घेतला ओव्हरडोस अन् इंजेक्शन; कारण आलं समोर…

हृदयद्रावक! आईची दोन्ही चिमुकल्यांना घेऊन मारली विहिरीत उडी…

हृदयद्रावक! कामवाल्या बाईने खिडकीतून पाहिलं अन् हादरलीच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!