आपण यांना ओळखता का? बक्षिस देण्यात येईल…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत एक महिला मृतावस्थेत आढळली आहे. संबंधित महिलेबाबत आपणास माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

०९/१२/२०२३ रोजी १०.४० वा चे पुर्वी पासलकर चौक ते गंगाधाम चौक हया दुहेरी वाहतुकीचे रोडचे पश्चिम बाजुस गोयल गार्डनसमोर रोडचे कडेला असणारे जय संतोषी मॉ आयुर्वेदिक कॅम्प, बिबवेवाडी, पुणे या कापडी तंबुत महिला आढळून आली आहे. तिचे वर्णन पुढीलप्रमाणे…

अनोळखी महिला वय अंदाजे ४०-४५ वर्षे तिचे डोके दक्षिणेस व पाय उत्तरेस उताणे स्थितीत पडलेली. महिलेच्या चेह-यावर कशाचे तरी सहाय्याने मारहाण करुन छिन्नविछिन्न केलेला असल्याचे दिसून आले आहे. तिच्या अंगावर काळे रंगाचा त्यावर पांढरे रंगाची फुलापानाची डिझाईन असलेला गाऊन, पायात पांढरे धातुचे पैंजण, उजवे हाताचे दंडावर गोंदण कमल हे नाव व इतर अस्पष्ट दिसत आहे. पोटरीवर सापाची डिझाईन व इतर गोंदण, डावे हाताचे मनगटावर गोंदण व लाल सोनेरी रंगाच्या काचेच्या बांगडया, डावे हाताचे अनामिका बोटामध्ये पांढरे धातुची अंगठी, व हातात लाल सोनेरी रंगाच्या काचेच्या बांगड्या, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडलेले, रंगाने काळी सावळी आहे.

सर्व नागरीकांना सुचित करण्यात येत आहे की, वरिल वर्णनाची मृत महिलेबाबत काही माहिती असल्यास आपण खालील नंबरवर संपर्क करावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल व योग्य ते बक्षिस देण्यात येईल.
संपर्कः
१) सविता ढमढेरे वरिष्ठ पो निरीक्षक, ९३२२२१६४९१
२) प्रविण काळुखे, सहा. पोलिस निरीक्षक, ८८०५०२६९९५
३) संजय आदलिंग, पोलिस उप निरीक्षक, ९०२८०४५४५४
४) बिबवेवाडी पो.स्टे.पुणे शहर ०२०-२४२८२००३

बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्यास २४ तासाच्या आत केली अटक…

पुणे शहरात अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन युनिट ५ने १० गुन्हे केले उघड…

पुणे शहरात लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू…

पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…

पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!