
नवरा तिसरं लग्न करत असतानाच दोघी मंडपात पोहोचल्या अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक व्यक्ती पहिल्या बायकोचा मृत्यू आणि दुसऱ्या बायकोसोबत घटस्फोट झाला असल्याचे सांगत तिसरं लग्न करण्याच्या तयारीत असतानाच पहिल्या दोन्ही बायका लग्नाच्या मंडपात पोहोचल्या आणि एकच गोंधळ उडाला. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी घटनास्थळ गाठत हे लग्न थांबवले. फसवणूक करणाऱ्या वराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील समथर पोलीस स्टेशन हद्दीतील बसोवई गावातील रहिवासी विनय कुमार यांची मुलगी दीपा हिचे लग्न जालौन येथील रहिवासी जितेंद्र कुमार याच्याशी निश्चित झाले होते. गुरुवारी रात्री लग्नाच्या नवरी वरातीची वाट पाहत होते. सर्व तयारी पूर्ण झाली होती.
विवाहाची तयारी सुरू असतानाच विनीता आणि पूजा नावाच्या दोन महिला विवाह सोहळ्यात आल्या. त्यांनी त्या जितेंद्र या नवरदेवाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नी असल्याचे सांगितले. हे ऐकून वधूच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. विनीताच्या म्हणण्यानुसार, 10 वर्षांपूर्वी जितेंद्रसोबत तिचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुलीही आहेत. पूजाने सांगितलं की, जितेंद्रने तिला पहिली पत्नी विनीताच्या मृत्यूबद्दल सांगून तिच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांना दोघांनाही एक मुलगी आहे.
दोघींची फसवणूक केल्यानंतर तो दीपाशी तिसरं लग्न करणार होता. सर्व माहिती घेऊन दोघीही तिथे आल्या. नागरिकांनी संपूर्ण प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न केला. जीतेंद्र याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, त्याला तोपर्यंत सर्व काही समजले होते. वधूकडील लोकांच्या म्हणण्यानुसार, जितेंद्रने दीपाला पहिल्या पत्नीचा मृत्यू आणि दुसरीसोबत घटस्फोट झाल्याचे सांगून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले होते. एकच गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लग्न थांबवले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं…
16 नातवंडे असणाऱ्या 70 वर्षीय आजोबांनी केले दुसरे लग्न अन्…
जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…
पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…
राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

