हृदयद्रावक! कुत्रा चिमुकलीच्या अंगावर आदळल्याने मृत्यू तर कुत्रा…

ठाणे: ठाण्यातील मुंब्रामध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरुन कुत्रा पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मुंब्रामधील अमृत नगरमध्ये चिराग मेसन इमारतीच्या 5व्या मजल्यावरुन एक कुत्रा थेट खाली पडला. यावेळी 3 वर्षांची मुलगी आपल्या आईसोबत रस्त्याने चालत होती. कुत्रा नेमका या मुलीच्या अंगावर पडला. या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा यावेळी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेतील कुत्रा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राणी रुग्णालयात नेण्यात आले आहे. संबंधित घटना मंगळवारी दुपारी 2 वाजता घडली असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मुंब्रामधील अमृत नगरमध्ये चिराग मेंशन इमारतीच्या टेरेसवर जैद सय्यद नावाचा व्यक्तीने कुत्रा पाळला होता. मंगळवारी (ता. ६) दुपारी हा कुत्रा अचानक पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळला. यादरम्यान रस्त्यावरुन आईसोबत जाणाऱ्या 3 वर्षांच्या जाणाऱ्या मुलीच्या अंगावर हा कुत्रा पडल्याने तिचा या घटनेत मृत्यू झाला. कुत्रा अंगावर पडताच सदर मुलगी जागेवरचं बेशुद्ध पडली होती. आई ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. पण, मुलीचा दुदैवी मृत्यू झाला आहे. कुत्रा देखील खाली पडल्यानंतर काही काळ बेशुद्ध होता. परंतु, काही वेळाने कुत्रा जागेवरुन उठल्याचे व्हिडीओद्वारे समोर आले आहे.

यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…

Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दुरावस्था; चालताही येईना…

दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…

कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…

पुणे शहरात कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा दाखल…

हृदयद्रावक Video: वडिलांच्या मिठीतच सोडला प्राण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!