हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…

मुंबई : वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या विनोद लाड (वय २८) या युवकाचा मृत्यू झाला आहे. विनोद लाड याचा सात दिवसांनी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

विनोद लाड 20 जुलै रोजी कामावरून घरी परतत होता. तेव्हा वरळी सी लिंक जवळ अब्दुल गफ्फार खान रोडवर एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने त्याला धडक दिली. विनोदच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर बीएमडब्ल्यू चालक घटनास्थळावरून फरार झाला. पाठीमागून आलेल्या गाडीवाल्याने विनोदला रुग्णालयात दाखल केले होते.

विनोदला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर गेल्या सात दिवसांपासून उपचार सुरू होते. शनिवारी उपचारावेळी त्याचे निधन झाले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार चालक किरण इंदुलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

हिट ऍण्ड रन! ओळख लपवण्यासाठी गाडीतच कापले केस आणि केली दाढी…

हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!