बिल्डर अपहरण प्रकरण! भारत-पाक सीमेवजवळून 1 कोटी 33 लाखांची कॅश जप्त…

नाशिक : नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण केल्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधील भारत-पाक सीमेजवळच्या अती दुर्गम अशा मौर्या गावातून एकाला ताब्यात घेतले असून, 1 कोटी 33 लाख लाख रूपयांची खंडणीची रक्कमही जप्त केली आहे.

नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे गेल्या आठवड्यात इंदिरानगरमधील त्यांच्या बंगल्यासमोरून अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्ते पहाटे पारख यांना सुरतजवळ सोडून गुन्ह्यातील बोलेरो जीपमधून फरार झाले होते. तेव्हापासून नाशिक शहर पोलीस याप्रकरणाचा तपास करत होते. अपहरणकर्त्यांचा माग काढण्यात गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांना यश आले आहे.

नाशिकच्या इंदिरानगर भागातील श्रद्धा विहार कॉलनीमधील ‘निहिता’ बंगल्याजवळ मोबाइलवर बोलत असताना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास चौघांनी शहरातील बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांचे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कॅम्पर जीपमधून (आर.जे.43 जीए 6553) अपहरण केले होते. पुढे त्यांना गुजरात राज्यात त्यांना सोडून ते पसार झाले होते.

गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने सलग 8 ते 10 दिवस कठोर परिश्रम घेत तांत्रिक पुराव्यांची साखळी जोडून अपहरणकर्त्यांचा माग थेट राजस्थानच्या जोधपूरपर्यंत काढला. तिथून संशयित आरोपी महेंद्र उर्फ नारायणराम बाबूराम बिश्नोई (वय 30, रा. मौर्या, ता.लोहावत. जि.जोधपुर), पिंटू उर्फ देविसींग बद्रीसीं बिश्नोई (29,रा.राजेंद्रनगर, जि.पाली), रामचंद्र ओमप्रकाश बिश्नोई (20,रा.फुलसरा छोटा गाव, जि.बिकानेर) आणि अपहरणाचा मास्टरमाइन्ड अनिल भोरू खराटे (25,रा.लहांगेवाडी, वाडीवऱ्हे) अशा चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचे तीन साथीदार हे अद्यापही फरार आहेत. गुन्ह्यात वापरलेली जीप व खंडणीच्या रकमेपैकी 1 कोटी 33 लाख रूपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

राजस्थान पोलिसांमध्ये तिघा संशयितांविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कामगिरी बद्दल तपास करणाऱ्या पथकाला 70 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले आहे. तसेच आयुक्तालयाकडून उत्कृष्ठ गुन्हे तपास व उकल केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे.

नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…

नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून; पण…

इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत उत्तर; संदीप पाणीपुरी खात असतानाच झाला गतप्राण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!