ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह! पुणे शहरात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाने दोघांना उडवले…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात पॉर्शे आणि वरळीतल्या हिट ऍण्ड रन प्रकरणानंतर पुण्यात आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन अपघात केला आहे. ड्रिंक ऍण्ड ड्राईव्हच्या या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झाले आहेत, त्याचबरोबर सौरभ गायकवाडही जखमी झाला आहे. पुण्यातील मांजरी-मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नरवर मंगळवारी पहाटे हा अपघात झाला.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

सौरभ गायकवाड हा त्याची MH 12 TH 0505 या नंबरची हॅरियर कार घेऊन पहाटे 5 वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता, त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्यामुळे समोरून येणारा पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने धडक दिली. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सौरभ गायकवाड हा देखील जखमी झाला आहे. त्यावेळी, तिथे जमलेल्या लोकांनी चालक व क्लीनर राजा शेख याला वरद लाइफ हॉस्पिटल येथे घेऊन उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी, चालकाच्या कपाळावर जखम झाली असून खांद्याला मुका मार लागला होता. तर क्लीनर राजा शेख याला उजव्या चेहऱ्यावर खर्चटलेले असून उजव्या पायाच्या नडगीला जखम झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघात झाला त्यावेळी सौरभ गायकवाड दारुच्या नशेत होता. या प्रकरणी सौरभ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ गायकवाड याचे वडील बंडू गायकवाड सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहेत.

दरम्यान, पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर पुण्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून कारवाईला वेग आला आहे. पुण्यात दारु पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द करण्यात येणार असल्याचेही पुणे पोलिसांनी यापूर्वीच सांगितले आहे.

पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…

ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा इशारा; थेट लायसन्स होणार रद्द…

पुणे जिल्ह्यात कारचा टायर फुटल्याने काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू…

पुणे शहरात गाडी अडवली म्हणून दोघांची पोलिसाला जबर मारहाण…

हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!