परदेशातील कामाच्या बनावट वर्क ऑर्डर; व्हिसा देणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी केली अटक…

पुणे (सुनिल सांबारे): ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर वगैरे कामाच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून तसेच ब्रुनेई देशाचा बनावट व्हिसा देवून फसवणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

हिंजवडी पोलिसांना, भुमकर चौक, वाकड भागात बनावट व्हीसा बनवून, परदेशात नोकरी लावून देऊ असे सांगुन नागरीकांची फसवणुक करणारे कार्यालय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तक्रारदार मनिष कन्हैय्यालाल स्वामी (वय ३२, रा. गड च्या मागे, राज का बारा, विश्वकर्मा भवन जवळ, चुरू, जि. चुरू, राज्य राजस्थान) यांनी तक्रार दिल्याने हिंजवडी पोलिस ठाणे, गु.र.नं. ८९/२०२४ भादवि कलम ४२०,४६५,४६८,४६९, ४७०,४७६,३४ प्रमाणे दाखल केली. त्यानंतर श्रीराम पौळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली राम गोमारे, सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शोध पथक यांनी blue ocean marine company, Icon tower unit no 102, कस्तुरी चौकाजवळ या ठिकाणी अचानक छापा टाकला.

१) विजय प्रताप सिंग, वय ४४, रा. अमर जाधव यांची रूम, साई नगर, मामुर्डी, पुणे मुळ गाव रा. पो. सलामतपुर, जि. गाजीपुर, उत्तर प्रदेश
२) किसन देव पांडे, वय ३५, रा. अमर जाधव यांची रूम, साईनगर, मामुर्डी, पुणे मुळ गाव रा. माजापुर, जि. सुलतानपुर, उत्तरप्रदेश
३) हेमंत सिताराम पाटील, वय ३८, रा. लेखा फार्मच्या मागे, मुकाई चौक, रॉयल पार्क, फ्लॅ नं १०२, किवळे, पुणे मुळ गाव रा. गवळे नगर, ता. धुळे, जि. धुळे यांना ताबेत घेवून त्यांचे ऑफीसमधुन ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर इत्यादी साठी कामगार हवे असल्याच्या बनावट वर्क ऑर्डर व ६७ पासपोर्ट जप्त केले. त्यातील ४८ पासपोर्टवर NEGARA BRUNEI DARUSSALAM या देशाचे व्हिसा चे खोटे शिक्के आहेत. तसेच सदर ठिकाणाहून दोन लॅपटॉप एक कॉम्पुटर व ७ मोबाईल, बनावट शिक्के असा एकुण १,६८,१५०/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपींना दिनांक २८/०१/२०२४ रोजी ०१/३० वा. अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडे चौकशी केली असता ते पुढील ७ दिवसात त्यांचे कार्यालय बंद करून पळुन जाणार होते. अशी माहीती मिळाली आहे.

सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान तपास पथकाचे अधिकारी राम गोमारे सहायक पोलिस निरीक्षक यांनी यातील आरोपी नामे हेमंत पाटील याचेकडे कौशल्याने तपास करता, त्या तीघांनी NEGARA BRUNEI DARUSSALAM या देशाचा व्हिसाचा बनावट शिक्का तयार करून घेतल्याचे सांगून तो कोठे बनवला ते दाखवले. त्या ठिकाणी जाऊन पहाता सदर दुकान युनिक प्रिंटर्स अँड झेरॉक्स, गाळा नंबर ५ व ६, श्रीजी टेरेस बिल्डींग, शिवसाई चौक, पुर्णानगर, चिखली पुणे हे असुन त्याचे मालक किरण अर्जुन राऊत (वय ३४, रा. शिव अपार्टमेंट, फ्लॅ नं १३, शाहु नगर, चिंचवड, पुणे) हे आहेत. सदर दुकानावर “या बसा शिक्के घेऊनच जा” अशी मोठ्या अक्षरात जाहीरात केलेली आहे. मालक किरण राऊत यांना विश्वासात घेऊन तपास करता त्यांनी आरोपींची कोणत्याही प्रकारची खात्री न करता, अगर त्यांचेकडे शिक्के बनवण्यासाठीचे अधिकार आहेत काय हे न तपासता पैशाचे लालसेने NEGARA BRUNEI DARUSSALAM या देशाचा व्हिजाचा बनावट शिक्का तसेच इतर शिक्केही बनऊन दिल्याचे सांगीतले. त्यांनी बनावट शिक्के बनवण्यासाठी वापरलेले मशीन व इतर साहित्य अशी ६०,३८०/- रू चा मुद्देमाल जप्त करून किरण अर्जुन राऊत (वय ३४, रा. शिव अपार्टमेंट, फ्लॅ नं १३, शाहु नगर, चिंचवड, पुणे) यांना दाखल गुन्ह्याचे कामी दि. १/०२/२०२४ रोजी २१:०० वा. अटक करण्यात आली आहे.

पुढील तपासात आरोपी विजयप्रताप सिंग याने त्याचे राहते परिसरातील डिटॉक्स लॉड्री, शॉप नं. २, ग्राऊंड फ्लोअर, गजानन सोसा., साई मंदीरजवळ, साईनगर देहुरोड, मामुर्डी, पुणे चे मालक शिरीष आनंद वानखेडे (वय ५७, रा. सिंधुनगर, एलआयसी कॉलनी, से. २५, घ.नं. ११/२, निगडी प्राधिकरण, पुणे) यांचेकडे काही पासपोर्ट ठेवले असल्याचे समजलेने डिटॉक्स लाँड्री येथे जाऊन मालक शिरीष वानखेडे यांना विश्वासात घेऊन तपास करता त्यांनी आरोपी विजयप्रताप सिंग यास ४ महीन्यापासुन ओळखत असून, त्याने महत्वाची कागदपत्रे म्हणून ठेवण्यास दिलेली पिशवी हजर केली. त्यामध्ये एकंदरीत ५८ पासपोर्ट मिळुन आले ते पंचनाम्याने जप्त करण्यात आले.अशा प्रकारे बनावट व्हिजा बनऊन त्याद्वारे तरूणांना परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न दाखवून त्यांचेकडे रक्कम उकळुन, सात दिवसात पळुन जाण्याचा मनसुबा रचणारे आरोपीतांना कौशल्याने वेळीच अटक करून त्यांचेकडून एकुण १२५ नागरीकांचे पासपोर्ट जप्त करून, तसेच त्यांना बनावट शिक्के बनऊन देऊन त्यांच्यात सामील होणारे आरोपीस अटक करून विशेष कामगीरी केली आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, बापु बांगर, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड, श्रीराम पौळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिंजवडी पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिस ठाणेकडील तपास पथकातील, राम गोमारे सहा. पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस उप निरीक्षक बंडु मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, नरेश बलसाने, पो.हवालदार कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, मंगेश सराटे, पोलिस नाईक रितेश कोळी, अरुण नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, पोलिस शिपाई अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे व सागर पंडीत यांनी केली आहे.

हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून पकडला १८ लाख रुपयांचा गुटखा…

हिंजवडीत दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक…

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीकडून पकडल्या ११ मोटारी; पाहा क्रमांक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!