
इन्स्टाग्रामवरून ओळख अन् लॉजमध्ये शारिरीक संबंध; तक्रार दाखल…
बुलढाणा: एका युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात घडली आहे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित युवतीचा जबाब नोंदवून घेतला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास यामे असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. दोघांची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती.अनेक दिवस इन्स्टाग्रामवर चॅटींग केल्यानंतर दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडले आणि भेटीगाठी सुरू झाल्या.
१७ जून २०२४ रोजी आरोपी आणि पीडितेला घेऊन शेगावला आला होता. याठिकाणी दोघंही एका लॉजवर थांबले होते. याठिकाणी आरोपीनेने पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये पुन्हा दोघे शेगावला भेटले. यावेळीही आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. वारंवार शरीरसंबंध ठेवल्यानंतर मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
डिसेंबर महिन्यापासून आरोपीने पीडितेसोबतचा संपर्क तोडला. आरोपी केवळ लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी शरीरसंबंध ठेवतोय, ही आरोपीची चाल लक्षात आल्यानंतर युवतीने थेट शेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार आरोपी तरुणीने केली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…
सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…
लग्नाआधीचे प्रेम! नवऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जाग आली अन्…
डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…
प्रेमी युगलाने रेल्वेसमोर उडी मारून घेतला जगाचा निरोप…

