
यवतमाळ! अनैतिक संबंधातून युवकावर प्राणघातक हल्ला…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील येरंडगाव येथील एका ४० वर्षीय व्यक्तीवर इंजाळा जंगल शिवारात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका युवकाविरोधात खुन करण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे पुढील तपास करीत आहे.
पोलिस सुत्रानुसार, सुरेश हुशन्ना मोलगुलवार (वय ४०, रा. येरंडगाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, राहुल रमेश मोगरे (वय अंदाजे २५, रा. येरंडगाव) याच्यावर घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुभद्रा हाशन्ना मोलगुलवार (वय ७२, रा. येरंडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेश मोलगुलवार यांचे काही वर्षांपासून आरोपीच्या आईसोबत विवाहबाह्य संबंध होते. याबद्दल राहुल मोगरे याच्या मनात राग होता. २९ जून २०२५ रोजी सकाळी दोघे पेंटिंगच्या कामासाठी एकत्र बाहेर पडले होते. मात्र, दुपारी २.३० च्या सुमारास गावातील सुमीत इंगळे यांनी सुभद्राबाईंना कळवले की, सुरेश हा इंजाळा जंगलात गंभीर अवस्थेत दिसला आहे. त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. सुरेश यांना तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
सदर तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालानुसार राहुल मोगरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलिस पुढील तपास करीत आहे.
एकतर्फी प्रेम! मैत्रिणीने भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावलं अन्…
हृदयद्रावक! नविवाहित युवतीने घेतला जगाचा निरोप; व्हॉट्सअॅपवर म्हटले की…
अमरावती! पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येचे कारण आलं समोर…
पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…
महाराष्ट्र हादरला! महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या…

