येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्याचा ससूनमध्ये मृत्यू…

पुणे (संदीप कद्रे): येरवडा येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका बंद्याचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५९, रा. खेडेकर मळा, उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत बंद्याचे नाव आहे.

बाळासाहेब जयवंत खेडेकर या बंद्यावर लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं-३८१/२०२१, सेशन केस क्रमांक- ९९२/२०२१, भा. द. वि कलम ३०२, १२०-ब सह आर्म अॅक्ट ४ (२५) सह क्रिमिनल लॉ अॅमेडमेंट अॅक्ट ३, ७ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) १३५ व मोका कलम ३(१)(i), ३(२), ३ (४) अन्वये गुन्हा दाखल होता. न्यायालयाचे आदेशान्वये ०४.०८.२०२१ पासून येरवडा कारागृहात दाखल होता. सदर बंदी २४.०१.२०२३ ते दि.०४.०२.२०२३ रोजी पर्यंत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे उपचारास्तव आंतररुग्ण म्हणून दाखल होता. १०.०९.२०२३ रोजी सदर बंद्यास कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता, उजव्या बाजुचा अर्धांगवायू व रक्तदाब जास्त वाढल्याने तातडीचे प्राथमोपचार करून पुढील उपचाराकरीता कारागृह रुग्णवाहीकेतून जेलगार्ड मार्फत तात्काळ ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे पाठविण्यात आले होते.

संबंधित बंद्यास उच्च रक्तदाब, मधुमेह व अर्धांगवायुचा आजार होता. सदर बंद्यास वॉर्ड क्र.०३ मध्ये ऍडमीट करण्यात आले होते. त्यानंतर बंद्यावर MICU वॉर्ड क्र.०४ मध्ये औषधोपचार चालू होते. आज (बुधवार) पहाटे ०३.३० वा. ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय ओघले यांनी बंद्यास मयत घोषीत केले. याबाबत कर्तव्यावरील कारागृह शिपाई मोईस शेख यांना पहाटे ०३.४० वा. येरवडा मध्यवर्ती कारागृहास दुरध्वनीव्दारे कळविले आहे.

सदर बंद्याचे मृत्युप्रकरणी येरवडा पोलिस ठाणे यांचे अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे इन्क्वेस्ट पंचनामा व शवविच्छेदन करुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच याबाबत बंद्याचे नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. सदर मृत्यु प्रकरणाची न्यायदंडाधिकारीय चौकशी होणेबाबत मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांना विनंती करण्यात आलेली आहे.

कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या…

 

येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…

महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!