धक्कादायक! मालिश करून देण्याच्या नावाखाली मुलींशी गैरप्रकार…

पुणे: पतीपासून विभक्त झाल्यानंतर एका युवकासोबत राहणाऱ्या महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींवर संबंधित युवकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पतीपासून विभक्त राहत असून, तिच्या १५ आणि १४ वर्षांच्या दोन मुली आहेत. तिने निवासासाठी आरोपीसोबत राहणे सुरू केले होते. महिला कामानिमित्त घराबाहेर असताना आरोपी मुलींना विविध कामांच्या निमित्ताने बोलावत असे. मालिश करून देण्याच्या नावाखाली त्याने दोन्ही मुलींशी गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे. धाकट्या मुलीवर अत्याचार करण्याचाही त्याने प्रयत्न केला होता.

याबाबतची माहिती कोणाला दिल्यास वडिलांकडे परत पाठविण्याची धमकी देऊन आरोपीने मुलींना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या मुलींनी आईला सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. विमानतळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पुणे शहरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंध…

पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…

पुणे! युवतीने 9व्या मजल्यावरून घेतली उडी; हृदयद्रावक चिठ्ठी…

पुणे हादरलं! महिलेने गुंगीचं औषध देऊन युवकावर केला बलात्कार…

पुणे शहरात चिमुकल्याला सावत्र आई-वडिलांकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!