मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आरोपींच्या मोबाईलमध्ये 546 मुलींचे अश्लील फोटो अन् व्हिडिओ…

लखनौ (उत्तर प्रदेश): वाराणसी येथील सामूहिक बलात्कारप्रकरणातून एका मोठ्या सेक्स रॉकेट उघड झाले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या 12 आरोपींच्या मोबाइलमध्ये 546 मुलींचे नग्न व अश्लील व्हिडीओ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अश्लील व्हिडिओ ज्या मोबाइलवर शेअर केले आहेत, त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह सहा राज्यांमध्ये आढळून आले आहे. या घटनेतील प्रमुख सूत्रधार व कांटिनेटल कॅफेचा मालक अनमोल हा उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल व तामिळनाडूत मुली पाठवत होता, अशी माहिती समोर आली आहे.

वाराणसीमध्ये 23 नराधमांनी अत्याचार झालेल्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या प्रकरणाचा तपास आता सेक्स रॅकेटकडे वळला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या 23 पैकी 12 मुलांचे मोबाईल फोन तपासले तेव्हा 546 मुलींचे नग्न व्हिडिओ आणि फोटो आढळले. शिवाय, ज्यांना हे व्हिडिओ शेअर केले आहेत त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह इतर सहा राज्यांमध्ये आढळले आहे. या सामूहिक बलात्काराचे धागेदोरे केवळ 23 आरोपींपुरते मर्यादित नाहीत तर ते सहा राज्यांशी जोडलेले आहेत.

कांटिनेटल कॅफेचा मालक अनमोल गुप्ता याच्याकडून जप्त केलेल्या दोन मोबाईल फोनमध्ये मुलींचे सर्वात आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळले आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवरून डाउनलोड केलेले नाहीत तर त्यांच्या कांटिनेटल कॅफेमध्ये बनवलेले आहेत. पोलिसांनी त्यांना फॉरेन्सिक तपासणीसाठी आग्रा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले आहे. तो हे नग्न फोटो आणि व्हिडिओ त्याच्या ग्राहकांना पाठवत असे आणि जुन्या ग्राहकांपासून नवीन ग्राहक निर्माण करण्यासाठी एक चैन चालवत होचा. कारण एकाच्या मोबाईल फोनमध्ये एक डेटाशीट देखील सापडली आहे.

अनमोल याने पोलिसांना सांगितले की, त्याचे वडील शरद गुप्ता देखील सेक्स रॅकेटचा भाग आहेत. 2022 मध्ये अनमोलला त्याचे वडील शरद गुप्तासह सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी ड्रग्ज व्यसनी आहेत.

तुळजापूर अमली पदार्थ रॅकेट! महिलेकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड…

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फर्दाफाश, तीन रशियन महिलांसह…

प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!