भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…
नाशिक: मनमाड-येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २६) घडली आहे. अंकाईजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला झाला. अपघातातील सर्व प्रवासी हे नाशिकमधील गंगापूर या ठिकाणचे आहेत.
रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव असून पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहेत. मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवला मार्गे नाशिककडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात कार अक्षरशः चक्काचूर झाली.
पाच मित्रांचा जागीच मृत्यू…
अनकवाडे शिवारात रेल्वे ओव्हरब्रिजवर स्विफ्ट कार (क्रमांक एम एच 06 ए एन 8890) कंटेनरची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यावेळी गणेश शरद सोनवणे, ललित शरद सोनवणे (रा. पेठ रोड नाशिक) या दोन सख्ख्या भावासह श्रेयस धनवटे, रोहित धनवटे (रा. पंडित कॉलनी, नाशिक) आणि प्रतीक नाईक या पाच मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. मनमाड शहर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन, त्या सर्वांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी करून सर्वांना मृत घोषित केले.
दरम्यान, पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…
बीडमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेतील चौघांचा तर ट्रॅव्हल्समधील सहा जणांचा मृत्यू…
नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…
भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!