
व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फर्दाफाश, तीन रशियन महिलांसह…
ठाणे: ठाणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सेक्स रॅकेटचा फर्दाफाश केला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सुरू असलेले मोठे सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. वागळे इस्टेट भागातील फ्युजन ढाब्याजवळ सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून ठाण्यात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक १६ येथील फ्युजन ढाब्याजवळ जुहू येथील काही दलालांकडून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपी दलाल काही रशियन आणि भारतीय महिलांचे फोटो व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून देहव्यापार करत होते. याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी पोलिसांनी वागळे इस्टेट भागात छापेमारी केली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी तीन रशियन आणि एक भारतीय महिला आढळून आली. पोलिसांनी या चारही महिलांची सुटका केली असून मुंबईतील ७ ते ८ दलालांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे आरोपी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहक शोधत असत, ग्राहकांना रशियन आणि भारतीय महिलांचे फोटो पाठवून त्यांच्या सेक्स रॅकेट चालवत होते. या सर्व आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना गजाआड करू अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत ठाण्यातील कासार वडवली भागात सुरू असलेला वेश्याव्यवसायही पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. कासार वडवली गावात देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणे पोलीस दलातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या चेतना चौधरी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हे प्रकरण उघडकीस आणले आहे. वेश्याव्यवसायात गुंतलेल्या दोन महिलांची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…
पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…
लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश…
सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…
पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

