
बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): मौजा ढोकी (वाई) ता. केळापूर येथील पिडीत बालीकेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी नागेश उर्फ श्रीकांत मधुकर तेलंग यांस केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली व रुपये २००० दंड ठोठावण्यात आला. सदर खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी मांडली.
मौजा – ढोकी (वाई) ता. केळापूर येथे ३१ जुलै २०१८ रोजी दुपारी १२.०० वाजताचे दरम्यान पिडीता ही घरी झोपून होती. शेजारी राहणारा नागेश तेलंगे हा पिडीतेच्या गोठ्यातील कुटार काढून दे असे पिडीतेला म्हणू लागला व पिडीतेला घरी नेण्यासाठी प्रयत्न करु लागला. परंतु पिडीता ही गेली नाही. मात्र, आरोपी नागेश तेलंगे याने पिडीतेचा हात पकडून तिला गोठ्यात नेऊन तिचेवर बलात्कार केला. अशा पिडीतेच्या बयाणावरुन आरोपी नागेश तेलंगे विरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ (३), ३७६ (२) (!), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ४, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३ (२) (v), ३ (२) (v), ३ (१) (va) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर प्रकरणाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी करून पांढरकवडा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाने एकूण १५ साक्षीदार तपासले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अभियोग पक्षाची बाजू ग्राहय धरुन आरोपी नागेश तेलंगे यांस भादंवि कलम ३७६ (३) व ३ (२) (va) प्रकरणात २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व २००० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला आणखी अतिरिक्त शीक्षा भोगावी लागणार आहे. तसेच कलम ३ (१) (w) (!) मध्ये २ वर्षाची शिक्षा ठोठावली व १००० रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आरोपीला आणखी अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी युक्तीवाद केला. तर आरोपीतर्फे ॲड. शितल जैस्वाल यांनी बाजू मांडली.
अल्पवयीन मुलीचा झोपेत असताना केला विनयभंग; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…
हृदयद्रावक! इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीचा तडफडून मृत्यू…
IPS जालिंदर सुपेकर यांच्याबाबत सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…
हृदयद्रावक! गर्भवती विवाहितेने उचचलं टोकाचं पाऊल; धक्कादायक कारण…
कोल्हापूर! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीला तडफडून मारलं…

