सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…

नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सना खान यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अमित शाहू याला नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. पोलिस सध्या त्याची चौकशी करत असून, सतत नवनवे खुलासे समोर येत आहेत. सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू हा सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असे समोर आले आहे. तो श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. एका 35 वर्षीय महिलेच्या माध्यमातून धनदांडग्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तो ब्लॅकमेल करायचा. यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा. आरोपीने अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे.

यात काही राजकीय व्यक्तीसुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे. अमित शाहू आणि त्याच्या साथीदारांविरोधात खंडणी, ब्लॅकमेल, गुन्हेगारी कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, सना खान या 2 ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. या प्रकरणी नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेरीस या प्रकरणी आरोपी अमित शाहुला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असताना त्याने सना खान यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितने पत्नी सना खानची हत्या ही पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचे समोर येत आहे. अमित साहूने पत्नीकडून 50 लाख रुपये इतकी रक्कम पार्टनरशिपसाठी घेतली होती. सनाने हे पैसे परत मागितले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला होता. यावादामधूनच त्याने हत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात पुढील अपडेट…

…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं

भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…

मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!