नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

नाशिकः नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद साधण्यासाठी, समस्या जाणून घेण्यासाठी जॉगिंग ट्रॅकला पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व समस्या जाणून घेतल्या. नागरिक व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी स्वःता संवाद साधल्यामुळे अनेकजण भारावून गेले होते.

पोलिस हा गणवेशातील नागरीक असून नागरीक हे साध्या वेषातील पोलिस आहेत. त्यामुळे समाज निकोप राहण्यासाठी दोघांमधील असणारा समन्वय व सुसंवाद सौहार्दपूर्ण असणे गरजेचे आहे, ही बाब पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी विचारात घेवून त्यांच्या संकल्पनेतून नागरीकांशी सुसंवाद साधण्यासाठी, पोलिसांच्या कामकाजा संबंधात नागरीकांकडून फिडबॅक घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाशिक शहरातील सर्व पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात असलेल्या ३५ जॉगींग ट्रॅकला २४/०२/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजता वरीष्ठ पोलिस अधिका-यांनी भेटी दिल्या.

मॉर्निग वॉक करीत असलेल्या नागरीकांच्या प्रत्यक्ष भेटी घेवुन नागरीकांशी संवाद साधला. त्यामध्ये जेष्ठ नागरीक, महिला, खेळाडू तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधुन त्यांना असणा-या समस्या जाणुन घेवून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच गोल्फक्लब ग्राऊंड या ठिकाणी स्वत: पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी भविष्याकडे अपेक्षेने पाहणा-या व स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या तरुणांना वेळेचे नियोजन सांगून २४ तासातील ६ तास आरामाचे सोडून कमीत कमी १४ ते १५ तास अभ्यास केल्यास यश निश्चीत आहे, असे मार्गदर्शन केले. इतर जॉगींग ट्रॅकचे ठिकाणी प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) हे इंदिरानगर जॉगींग ट्रॅक, मोनिका राऊत, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २ या डीजीपी नगर जॉगींग ट्रॅक, चंद्रकांत खांडवी, पोलिस उप आयुक्त (मुख्यालय) हे पांडवलेणी, किरणकुमार चव्हाण, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ- १ हे कृषीनगर जॉगींग ट्रॅकवर यांनी तसेच अन्य जॉगींग ट्रॅक वर सर्व सहा. पोलिस आयुक्त, सर्व पोलिस निरीक्षक यांनी नागरीकांशी संवाद साधला.

पोलिस विभागाशी व इतर विभागाशी निगडीत असणा-या सार्वजनिक तसेच खाजगी समस्यांबाबत नागरिकांना माहिती दिली. बहुतेक समस्या या पार्किंगशी निगडीत होत्या. त्यापैकी ज्या बाबी पोलिस विभागाशी संबंधीत आहेत त्या तात्काळ सोडविण्याबाबत पोलिस आयुक्त यांनी संबधीत पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना व बिट अंमलदार यांना आदेशित केले व इतर विभागाशी निगडीत समस्या बाबत संबधीत विभागाला लेखी कळविण्याबाबत सुचित केले. नागरीकांना काही माहिती सांगावयाची असल्यास सी. पी व्हॅटस्अप क्रमांक जनतेसाठी खुला असून तात्काळ मदत हवी असल्यास डायल ११२ सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले.

नाशिक शहरातील विविध ठिकाणी असलेल्या जॉगींग ट्रॅकच्या ठिकाणी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), चंद्रकांत खांडवी, पोलिस उप आयुक्त (मुख्यालय), मोनिका राऊत, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २, सर्व सहा. पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाणे / शाखा प्रभारी अधिकारी तसेच इतर पोलिस अधिकारी अशा एकूण जवळपास १०० पोलिस अधिकारी यांनी नागरीकांच्या भेटी घेवून समस्या जाणून घेतल्या आहेत.

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…

नाशिकमध्ये पोलिस क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; संदीप कर्णिक यांच्याकडून उत्तम नियोजन…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हातात बॅट घेतली अन्…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…

पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!

संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!