ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; तिघे होरपळले, चौघांचा मृत्यू…

नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्राम येथे विलासपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. १०) रात्री एका ट्रकने पिकअप आणि कारला जोरात धडक दिली. या धडकेत पिकअपमधील एकाचा तर कारमधील तिघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि प्रथम पिकअपला धडक दिली. ही धकड इतकी भीषण होती की पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रक चालकाने एका स्विफ्ट कारला धडक दिली. या धडकेनंतर कारने पेट घेतला आणि गाडीतील तिघांचाही यामध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. पुढील तपास करत आहोत.

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

मुंबईत वरळी सी लिंकवर 6 वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू…

जबलपूरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

भारतीय अब्जाधीश उद्योगपतीसह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!