
सोलपूर ग्रामीण पोलिस दलात मोठा फेरबदल, पाहा कोणाची कोठे बदली…
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील तेरा पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काढले आहेत. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले, पदोन्नतीने हजर झालेले किंवा विनंतीवरून बदली मिळालेल्या पोलिस निरीक्षकांचा आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे.
पाहा नावे…
पोलिस निरीक्षक अविनाश पवार यांची नियंत्रण कक्ष येथून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे,
कुंदन गावडे यांची वैराग येथून सोलापूर तालुका पोलिस ठाणे,
दिपक पाटील नियंत्रण कक्ष येथून मोहोळ पोलिस ठाणे,
बाळू भरणे वाहतुक शाखा येथून टेंभुर्णी पोलिस ठाणे
अमुल कादबने यांची नियंत्रण कक्ष येथून वैराग पोलिस ठाणे
दशरथ वाघमोडे यांची पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथून माळशिरस पोलिस ठाणे
तय्यब मुजावर यांची पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथून पंढरपूर शहर पोलिस ठाणे
सुरेश चिल्लावार यांचे अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे येथून पंढरपूर तालुका पोलिस ठाणे
विकास दिंडुरे यांची माळशिरस पोलिस ठाणे येथून सायबर पोलिस ठाणे
दिपक बरडे नियंत्रण कक्ष येथून जिल्हा वाहतूक शाखा
कमलाकर गड्डीमे यांची नियंत्रण कक्ष येथून आर्थिक गुन्हे शाखा
सपोनि अक्षय सोनवणे पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथून बार्शी तालुका पोलिस ठाणे (प्रभारी)
सपोनि गणेश कड यांची आर्थिक गुन्हे शाखा येथून सोलापूर तालुका पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.
View this post on Instagram
आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…
अतुल कुलकर्णी यांच्या पहाट उपक्रमाची न्यायालयाकडून दखल!
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद: पद्मश्री कल्याण सिंह रावत
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

