जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…
रांची (झारखंड): रांची पोलिस दलातल्या माजी कॉन्स्टेबल सरोजिनी लाकरा यांनी जिद्दीच्या जोरावर आयपीएस अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आदिवासी कुटुंबातील सरोजिनी लाकरा यांची जीवन कहाणी प्रेरणादायी आहे. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या सरोजिनीला खेळाची उपजतच आवड होती. शाळेत जाण्यासाठी पाच किलोमीटर अनवाणी प्रवास करावा लागत असे. अॅथलेटिक्समध्ये कौशल्य मिळवत सातत्याने बक्षिसे जिंकली. तिने पहिल्यांदा खेळात रोख बक्षीस जिंकलं, तेव्हा त्या रकमेतून तिच्या कुटुंबाने गाय खरेदी केली. ही गाय तिच्या सुरुवातीच्या विजयाचं प्रतीक बनले.
सरोजिनी यांच्या कौशल्याने तिचे प्रशिक्षक रॉबर्ट किस्पोटा यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी तिला स्पोर्ट्स अकादमीत घेतलं. तिला केवळ तज्ज्ञांचं मार्गदर्शनच नव्हे तर भोजन आणि निवास यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. किस्पोटा यांच्या मार्गदर्शनाखाली सरोजिनीने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तिच्या जिल्ह्याचे आणि झारखंड राज्याचं प्रतिनिधित्व केले आणि पदकं जिंकली. क्रीडा क्षेत्रातल्या विलक्षण कामगिरीने तिची पोलिस दलातल्या करिअरची दारे उघडली. क्रीडा कोट्यातून पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. त्यानंतर ती यशस्वी होत गेली. 100 मीटर अडथळ्यांची शर्यत, 100 बाय 400 मीटर रिले, उंच उडी, लांब उडी आणि हेप्टॅथलॉन यांसह अनेक क्रीडा प्रकारांत तिने पदकं मिळवली. सरोजिनी लाकरा यांनी सार्वजनिक सुरक्षिततेसाठी झोकून देऊन काम केले.
राज्य पोलिस दलात काम करत असतानाच त्यांचा भारतीय पोलिस सेवेत प्रवेश झाला. सध्या सरोजिनी लाकरा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सरोजिनी यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी आहे.
सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…
पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!
अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!
अरविंद माने: अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी
शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!