सांगलीचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणादरम्यान वीरमरण…

सांगली : सांगली जिल्ह्याच्या पलूस गावचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार (वय २६) यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती. परंतु, प्रशिक्षणादरम्यान 20 किमी रनिंगचा अंतिम टप्पा पूर्ण करत असताना त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. आयटी कंपनीतील नोकरी सोडून ते सैन्य दलात भरती झाले होते.

लेफ्टनंट अथर्व कुंभार हे सैन्य दलात लेफ्टनंट पदावर भरती झाल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान 20 किमी रनिंगचा अंतिम टप्पा पूर्ण करत असताना त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. लेफ्टनंट अथर्व कुंभार यांच्या आकस्मिक दुःखद निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. भारत माता की जय.. वीर जवान तुझे सलाम.. अशा घोषणा देत त्यांच्यावर आज (मंगळवार) अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, अथर्व यांचा जन्म 22 ऑगस्ट 1999 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण किर्लोस्करवाडीतील किर्लोस्कर हायस्कूल येथे झाले होते. आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय येथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर, इन्फोसिस या आयटी कंपनीत दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न केले. त्यात, थेट लेफ्टनंट पदावर त्यांची भरती झाली होती. 3 महिन्यांपूर्वीच बिहारमधील गया येथे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये लेफ्टनंट पदासाठी त्यांचे ट्रेनिंग सुरू झाले होते. मात्र, प्रशिक्षणादरम्यान उष्माघाताने अर्थव यांना वीरमरण आल्याची माहिती आहे.

अथर्व यांना अकाली वीरमरण आल्ने कुंभार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्यामागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. बिहार येथून आज त्यांच्या पलूस या गावी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर, त्यांच्या घरापासून मुख्य बाजारपेठ, जुना बस स्थानक, नवीन बस स्थानकापासून स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी, भारत माता की जय.. वीर जवान तुझे सलाम.. अशा घोषणांनी भूमिपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला.

लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?

पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!