
स्वारगेट पोलिसांनी महिला चोरटयास केले जेरबंद; गुन्हे उघड…
पुणे (संदिप कद्रे): स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर अज्ञात चोरटयाचा शोध घेणेबाबत आम्ही स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते. त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलिस अंमलदार संदीप घुले, अनिस शेख व शिवा गायकवाड यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरात वारंवार पेट्रोलिंग करीत होते.
पोलिस अंमलदार संदीप घुले, अनिस शेख व शिवा गायकवाड यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक संशयित महिला स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये संशयितरित्या फिरत आहे. वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी केली असता मिळालेल्या बातमीप्रमाणेच एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर महिलेस महिला पोलिस अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेवुन तिचेकडे चौकशी करुन तिस अटक करुन तपासादरम्यान तिचेकडुन स्वारगेट पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या ०४ गुन्हयामधील चोरीस गेलेला एकुण ६० ग्रॅम (०६ तोळे) वजनाचा ०३,६०,०००/- रु किंमतीचा सोन्याचे दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करुन स्वारगेट पोलिस स्टेशन येथे दाखल असलेले एकुण ०४ गुन्हे उघड केले आहेत.
सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ- २, पुणे शहर, नंदिनी वग्यानी, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) तथा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन मोरे, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले,पो/अं १०१४७ संदीप घुले, पो/अं ९८२० अनिस शेख, पो/अं १००१६ शिवा गायकवाड, पो/अं ८२३९ सोमनाथ कांबळे, पो/अं १००६२ फिरोज शेख, पो/अं १००५७ सुजय पवार, पो/अं ९९६३ दिपक खेंदाड, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अं ३५४१ प्रविण गोडसे, मपोअं ११०८६ सुवर्णा सांगोलकर व मपोअं ३०८९ सुनिता घामगळ यांनी एकत्र मिळुन केली आहे.
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे शहरात जड वाहनांना नो एन्ट्री! पाहा बदल…
पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार
पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…
पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…

