अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!
पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.
पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत. प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा….
अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!
अनिकेत पोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायण गावमधील. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर पुढे उच्चशिक्षण घेत पोलिस दलात दाखल झाले. शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी विविध पदव्या मिळवल्या असून, पुढेही त्यांचे शिक्षण सुरू आहे. पोलिस दलातील धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणतही त्यांनी आरोग्य आणि अनेक छंद जोपसले आहेत. पोलिस दलात आल्याचे समाधान असल्याचे ते मनापासून सांगतात…
अनिकेत पोटे यांचा जन्म नारायणगावमधील. कुटुंब उच्चशिक्षित. वडील डॉक्टर, आई वकील, भाऊ बी-टेक आणि पत्नी डॉक्टर. अनिकेत पोटे यांनी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली असून, पुढे एलएल.बी., सायबर लॉ आणि नुकताच एलएल.एम.चा अभ्यास पूर्ण केला आहे. डॉक्टर आणि वकील कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले अनिकेत यांनी वेगळा मार्ग निवडला आणि पोलिस दलात दाखल झाले.
अनिकेत यांनी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवत असतानाच दुसऱ्या बाजूला एमपीएसीचा अभ्यास सुरू ठेवला होता. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण, दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यशाला गवसणी घातली आणि २०१२ मध्ये पोलिस दलात दाखल झाले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग ठाणे शहरात होती. ठाणेमध्ये कार्यरत असताना खूप काही शिकायला मिळाले. सध्या पुणे शहरात सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.
आमच्या कुटुंबात यापूर्वी कोणीही पोलिस दलात नव्हते. पण, एमपीएससीचा अभ्यास केला आणि पास झालो. ओघानेच पोलिस दलात रुजू झालो. कुटुंब एका बाजूला आणि माझा मार्ग जरी वेगळा असला तर समाजाची सेवा करण्याचे काम आम्ही सर्वजण करत आहोत. गोरगरिबांची कामे केल्याचे मोठे समाधान लाभत आहे. गेल्या दहा वर्षांपासून पोलिस दलात काम करत असून, मोठे समाधान आहे. काम कोणतेही असो. ते मनापासून केल्यानंतर समाधान मिळाले पाहिजे, ही शिकवण पहिल्यापासून आहे. त्यामुळे पोलिस दलात आल्याचे समाधान आहे. पुस्तकी अभ्यास जरी असला तर विरंगुळा किंवा आवड म्हणून काही तरी कला हवी. मी आजही ढोलकी, पियानो वाजवत असल्यामुळे ताणतणाव कधी जाणवत नाही, असे अनिकेत सांगतात.
शरीर कमावणे एवढेच आपल्या हातात आहे. ते जर आपल्या हातात असेल तर मग शरीर सुदृढ का ठेऊ नये? आमचे कुटुंबच पूर्णपणे सुदृढ आणि आरोग्याच्या काळजीबाबत लक्ष ठेवून असते. आई वयाच्या ६२ वर्षीही सायकलिंग करते. शिवाय, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षीस मिळवते. आईकडून मोठी प्रेरणा मिळते. खरं तर शरीर आणि कुटुंब महत्त्वाचे आहे. या दोन गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्हाला काम करताना अडचण येत नाही. एखादी व्यक्ती प्रथम तुम्हाला जेंव्हा भेटते त्यावेळी पैसा किंवा इतर गोष्टी दिसत नाहीत तर शरीर दिसते. आरोग्य, प्रकृती जर उत्तम असेल तर पहिल्या भेटीतच तुम्ही समोरच्या व्यक्तीला जिंकता. म्हणून आरोग्य खूप महत्त्वाचे आहे, असेही अनिकेत सांगतात.
व्यायामाची आवड…
शाळेत असल्यापासूनच व्यायामाची आवड होती. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर ठाण्याला असताना पोलिसांसाठी मोठी जिम आहे. त्या जिमचा चांगला उपयोग झाला. दररोज न चुकता एक तास जिममध्ये घालवतोच. कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्या तरी दिवसातील एक तास शरीरासाठी देतो. काही झाले तरी जिम चुकवत नाही. कोवीडच्या काळातही घरामध्येच जिम करत होतो. शिवाय, एक दिवस सायकलिंग करतो. किमान २५ किलोमीटर तरी सायकलीकरून फिरून येतो. यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यास खूप मदत होते, असेही ते सांगतात.
आहार…
कुटुंब सुशिक्षित आणि हेल्दी आहे. काय खावे आणि काय खाऊ नये, यावर कुटुंबियांचे बारकाईने लक्ष असते. तेलकट, तुपट खात नाही. महत्त्वाचे म्हणजे हॉटेलमधील चमचमीत पदार्थ तर मुळीच नाहीत. काही झाले तरी घरचा डबा सोबत ठेवायचा. मुख्य म्हणजे तुमचे जिभेवर नियंत्रण असायला हवे. जिभेवर नियंत्रण असेल ना तर शरीरसुद्धा नियंत्रित राहते. फिटनेस आणि खाण्यावर जर लक्ष दिले ना तर आरोग्य सुधारेल आणि आयुष्यही वाढेल. वीस वर्षांपूर्वीच चहा सोडला आहे. चहा पित नाही आणि वेळेवर जेवण आणि घरचे जेवण हेच माझ्या आरोग्याचे गमक आहे. आई आणि पत्नी तर पदार्थांच्या बाबतीत काळजी घेत असल्यामुळे शरीर सुदृढ आहे. सुदृढ शरीरामुळे कधी थकायला होत नाही. कायम फ्रेश वाटते.
वरिष्ठांकडून प्रेरणा…
आरोग्याबाबत आपण आपली काळजी तर घ्यायलाच हवी. पण, वरिष्ठांकडून मोठी प्रेरणा मिळत आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे देता येईल. त्यांच्यावर कामाची मोठी जबाबदारी असतानाही शरीर एकदम फिट आहे. सकाळी पाहिले तरी हसतमुख असतात आणि संध्याकाळी पाहिले तरी अगदी तसेच. कधीच थकलेले दिसत नाहीत. यामागचे कारण म्हणजे व्यायाम. सिंहगड चढायला सुरवात केली तरी ते दमताना दिसत नाहीत. सोबत असलेले दमून जातात. पण, ते भराभर सिंहगड चढतात. कारण, त्यांनी शरीर कमावले आहे. शरीर सुदृढ असेल तर कामाचा कितीही तणाव असला तरी जाणवत नाही.
दिवसाचा नित्यक्रमः
– सकाळी साडेपाच ते साडेसात मैदानावर
– साडेसात ते साडेआठ जीम
– १० वाजता ऑफिस
– सकाळी राजासारखा हेल्दी नाष्टा
– दुपारी थोड्या प्रमाणात जेवण
– संध्याकाळी एकदम कमी खाणे.
– बाहेरचे खाणे टाळतात.
– विविध छंद जोपासतात.
सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
‘पोलिसकाका विशेषांक’
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com