एटीएम कार्ड हातचलाखीने घेवून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): नागरीकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने घेवून बँकेचे खात्यामधून डेबीट कार्डद्वारे वेग-वेगळ्या एटीएम सेंटर मधून रक्कम काढून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे.

फिर्यादी हे २२/०९/२०२३ रोजी महालक्ष्मी विहार सोसायटी, विश्रांतवाडी चौक,पुणे येथील बँकेचे एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. सदर ठिकाणी दोन अनोळखींनी संगनमत करून फिर्यादी यांचेकडून त्यांचे पत्नी हिचे नावाचे डेबीटकार्ड हातचलाखीने घेतले. बँकेचे अंकाऊट मधून डेबीटकार्डद्वारे वेग-वेगळ्या ठिकाणी एटीएम सेंटर मधून रोख रक्कम काढली व काही वस्तु खरेदी केल्या. फिर्यादी यांची एकूण ८७,५८०/- रूपये किंमतीची फसवणूक केली म्हणून सदर अनोळखी विरोधात विश्रांतवाडी पोलिस स्टेशन, पुणे शहर गु.र.क्र. २७३/२०२३ भा.द.वि.क. ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्हय़ातील पाहिजे आरोपी बाबत गुप्त बातमीदारमार्फेत पोलिस अंमलदार, मोरे व खराडे यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हे कस्तुरबा होसिंग सोसायटीकडे जाणा-या रोडजवळील सारस्वत बँकेच्या एटीएम जवळ, विश्रांतवाडी,पुणे येथे येणार आहे. ०१/१०/२०२३ रोजी सदर बातमीचे अनुशंगाने पोलिस उप-निरीक्षक, महेश चव्हाण व इतर स्टाफसह सदर ठिकाणी सापळा लावून थांबले असता, फिर्यादी यांनी दिलेल्या आरोपीचे वर्णनाप्रमाणे दोन जण हे लाल रंगाच्या मोटार सायकल क्र. MH/12/EZ-3386 हिचेवरून बँकेच्या जवळ आल्याचे दिसल्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांना संशय आल्याने ते पळून जावू लागले. त्यावेळी पो. उपनि. चव्हाण यांनी सोबतच्या स्टाफच्या मदतीने शिताफीने
१) मयंककुमार संतराम सोनकर (वय २७ वर्षे, रा. व्दारका सकुंल अपार्टमेंट, परांडेनगर, धानोरी, पुणे मुळगांव- मु. पो. मोदाहा जि. हमीपुर, राज्य उत्तर प्रदेश)
२) कपील राजाराम वर्मा (वय – ३० वर्षे, सकुंल अपार्टमेंट, परांडे नगर, धानोरी, पुणे मुळगांव-मु. पो. बडनी जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे.

दोन पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी मयंककुमार सोनकर याचे पॅन्टीच्या खिश्यामध्ये वेग-वेगळ्या बँकेची १६ डेबिट कार्ड व त्यामध्ये वर नमुद गुन्ह्यातील फिर्यादी यांचे पत्नीचे नावाचे एसबीआय बँकेचे डेबिट कार्ड व रोख रक्कम ४५००/- रुपये मिळून आले आहेत. सदरचा ऐवज गुन्ह्याचे पुराव्याकामी जप्त करण्यात आले. दुसरा आरोपी कपील वर्मा यांचे पॅन्टच्या खिश्या मध्ये ०९ वेग-वेगळ्या बँकेची ०९ डेबिट कार्ड मिळून आली. सदर दोन्ही आरोपीकडे डेबिट कार्डबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच त्याचे ताब्यातील लाल रंगाची मो.सायकल क्र.MH/12/EZ-3386 हिचेबाबत त्याची कागदपत्रे व मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने सदर मोटार सायकलदेखील पंचासमक्ष जप्त केली आहे. सदर आरोपी यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता, त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता, आरोपींचा वरील गुन्हया व्यतिरिक्त विश्रांतवाडी पोलिस ठाणे गु.र.क्र.२७९/२३,भादवि कलम ४२०, ३४ व गुरक्र. २८१ / २३ कलम ४२०३४ या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पण झाले आहे. तपासा दरम्यान आरोपीकडुन वरील नमुद गुन्ह्यातील फिर्यादी यांचे एटीएम कार्डद्वारे खरेदी केलेले ६.९ ग्रॅम वजनाचे सोने किंमत ४५,०००/- रुपये, रोख रक्कम ४९,७००/- रुपये व मो. सायकल होन्डा स्टनर ५०,००० /- रुपये किची तसेच वेग-वेगळ्या बँकेची एकूण ६२ डेबिट कार्ड हस्तगत करण्यात आली आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त परिमंडळ-०४, पुणे शशीकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त, खडकी विभाग,पुणे, आरती बनसोडे वरिठ पोलिस निरीक्षक दतात्रय भापकर, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), भालचंद्र ढवळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप-निरीक्षक, महेश चव्हाण, पोलिस अंमलदार, चव्हाण, भोसले, बादेरे, मोरे, देवकाते, खराडे व पिसाळ यांनी केली आहे.

युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…

शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…

सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…

महिलेला कॅबमधून प्रवास करताना मित्रासोबत बोलणं पडले महागात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!