महिलेने आत्महत्येपूर्वी भिंतीवर लिहीले की, खरंच खूप थकले मी…

छत्रपती संभाजीनगर : एका महिलेने वारंवार पती संशय घेत असल्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिकलठाणा परिसरात घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अंजली नावाच्या महिलेने घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी घराच्या भिंतीवर तिने भिंतीवर आपली सुसाइड नोटही लिहिली होती. सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, ‘आता माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे गेले आहे. मला हे सहन होत नाही. तुमचा स्वभाव मी कितीही प्रयत्न केला तरी बदलू शकत नाही. मला माहिती आहे, तुम्ही आज ना उद्या मला गावाकडे नेऊन सोडता. परत मला आणणार नाही. मात्र हे असे कितीवेळ चालणार आहे. माझी पण इज्जत आहे. माझाही स्वाभिमान आहे. माझ्या आई-वडिलांचा अपमान किती सहन करायचा. खरंच खूप थकले मी…’

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत हडको परिसरातील रमानगरातील श्रद्धा राजेंद्र यादव या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिसऱ्या घटनेत जाधव वाडी परिसरातील प्रदीप शेषराव भोसले यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली. चौथ्या घटनेत रेल्वे स्टेशन परिसरात दिनेश रमेश ढोबरे या तरुणाने राहत्या घरी पत्राच्या शेडला कपड्याच्या बेल्टच्या साहाय्याने आत्महत्या केली. दोन दिवसात शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी या आत्महत्या समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहीले की…

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…

महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!