शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!

पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.  प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा….

 

शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
सोलापूरमध्ये बालपण आणि शिक्षण. आजोबा, वडील पोलिस दलातून सेवानिवृत्त. घरामध्ये यामुळे पोलिसांचे वातावरण. वडिलांकडे पाहून चौथीमध्ये असतानाच फौजदार होण्याचा निश्यच केला. कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यापर्यंत मजल मारणारे अधिकारी म्हणजे शब्बीर सय्यद. पोलिस दलात ते २८ वर्षांपासून कार्यरत असून, अनेक गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, २०० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात…

शब्बीर सय्यद यांचे बालपण आणि शिक्षण सोलापूर शहरातील. शाळेत असल्यापासूनच खो-खो आणि क्रिकेटची आवड. अगदी विद्यापीठ पातळीपर्यंत जाऊन खेळले आहेत. मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीरयष्टी पहिल्यापासून सुदृढ. कुटुंबात सात भाऊ. आजोबा पोलिस दलात कार्यरत होते. वडील पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. सध्या सय्यद कुटुंबातील चौघे जण पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आजोबांचा वारसा सय्यद कुटुंबाने पुढे चालवला आहे. यामुळे सय्यद कुटुंबाला पोलिस दलाचा मोठा वारसा आहे.

आजोबा, वडील पोलिस दलात असल्यामुळे शब्बीर सय्यद यांनी चौथीमध्येच असताना फौजदार होण्याचे ठरवले. शिक्षण सुरू असतानाच दिशा मिळाली होती. यामुळे खेळ आणि अभ्यास याकडेच लक्ष केंद्रीत केले होते. खेळामुळे शरीर पिळदार झाले होते. १९९२ मध्ये पदवी मिळविल्यानंतर पोलिस दलात जाण्यासाठी एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. दोन वेळा परीक्षा दिली. पूर्व परीक्षा पास झाले. मात्र, मुख्य परीक्षेत अपयश आले. पण, अपयशाने खचून जायचे नाही, हे खेळामधून समजले होते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.

कॉन्स्टेबल म्हणून रुजू…
एमपीएसीच्या परीक्षेत दोन वेळा अपयश आल्यामुळे वडिलांनी अर्थार्जनासाठी कुठेतरी नोकरी करण्याचा सल्ला दिला. पोलिस दल हे तर आवडीचे क्षेत्र होते. त्यामुळे तिथेच नशीब अजमावयाचे होते. दुसरीकडे अभ्यास आणि प्रयत्न सुरू ठेवायचे होते. १९९४ मध्ये पोलिस दलात भरती निघाली. खेळामुळे शरीर अगदीच फिट असल्यामुळे पहिल्या प्रयत्नातच नोकरी मिळाली. २९ जणांमध्ये दुसरे आले होते. पण, ध्येय अधिकारी होण्याचे होते. मुख्यालयात रुजू झाले होते. पाच वर्षे काम केले. दरम्यानच्या काळात DYSPची पूर्व परीक्षाही पास झाले. पण, यश हुलकावणी देत होते…

सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…

‘पोलिसकाका विशेषांक’
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!