मला माझीच लाज वाटते; गुड बाय साकिब; माझं तुझ्यावर प्रेम आहे…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमध्ये युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पिंकी गुप्ता या युवतीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. युवतीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवत कुटुंबीयांनी आंदोलन केले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे.
पिंकी गुप्ता ही एका जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिथेच साकिब या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते दोघे एकत्र राहू लागले. पिंकीचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आले आहे. शिवाय, सुसाईड नोटही सापडली आहे.
साकिब याने पिंकीला त्याच्या प्रेमात अडकविले. वेगवेगळी स्वप्ने दाखवून तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला होता. काही दिवसांनी तो तिला त्रास देऊ लागला होता. साकिबचे वडील देखील पिंकीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत होते, असा आरोप तिच्या कुटुबीयांनी केला आहे. एकतर साकिबला सोड किंवा आत्महत्या करून मर, असे ते म्हणत होते, असा आरोप करत साकिबच्या घरच्यांनीच पिंकीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
घटनास्थळी पिंकीची सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘मला माझीच लाज वाटते. तुझ्यासाठी तुझ्याशी आणि माझ्याशी लढत होते. लोकांनी मला खूप समजावले, पण मला तुमच्या समोर काहीच दिसत नव्हते. मी तर माझा धर्म बदलण्याची तयारी केलेली, तुझे सर्वस्व स्वीकारण्याचा विचार केला. तू माझा कसा होशील याचा विचार करत राहिले, पण तुला ते समजलेच नाही. मला आता हे सगळं सहन होत नाही… गुड बाय साकिब… माझं तुझ्यावर प्रेम आहे.’
‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…
एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…
बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…
प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…
मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…