सायबर चोरट्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून निवृत्त अधिकाऱ्याची पत्नीसह आत्महत्या…

बेळगाव: एका निवृत्त अधिकाऱ्याने सायबर चोरट्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खानापुरा येथे घडली आहे. सायबर फसवणूक करण्यासाठी मयताच्या फोटो आयडीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते, अशी धमकी आरोपींनी व्हिडिओ कॉलवर दिली होती. अटकेच्या भीतीने दाम्पत्याने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

डिएगो नजरत (वय ८३) आणि पाविया नजरत (वय ७९) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. डिएगो हे महाराष्ट्रात रेल्वे विभागात अधिकारी होते. मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार या वृद्ध जोडप्याला फोन करून धमकावत होते. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून त्यांनी फोटो आयडीचा वापर करून काही लोकांची फसवणूक केल्याची धमकी दिली होती. धमक्यांना घाबरून या जोडप्याने विविध प्रसंगी फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात पाच लाख रुपये पाठवले होते. तथापि, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना अधिक पैसे देण्यासाठी छळ सुरू केला. या छळाला कंटाळून अखेर या जोडप्याने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली.

पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुलेडा यांनी सांगितले की, जोडप्याच्या घरी एक सुसाईड नोट सापडली आहे. “त्यांना (जोडप्यांना) त्यांच्या फोटो आयडीचा वापर करून कोणीतरी सायबर फसवणूक केल्याचा फोन आला. त्यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी तो कॉल दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केला. त्यांच्यात काय संभाषण झाले हे माहीत नाही. त्यांनी या प्रकरणातून सुटका करून घ्यायची असेल तर पैसे द्या, अशी मागणी केली. या जोडप्याने सायबर फसवणूक करणाऱ्यांना पाच लाख दिले होते. पण त्यांना होणारा त्रास कमी झाला नाही. अन्य एका व्यक्तीने सेम पॅटर्नने दाम्पत्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. त्यानंतर, जोडप्याने ज्या व्यक्तीला आधी पैसे दिले होते त्याला फोन केला. परंतु समोरून कुठलाही प्रतिसाद मिळला नाही. यानंतर जोडप्याने आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पाठवला आणि काही वेळात आत्महत्या केली.’

दरम्यान, नजरत हे महाराष्ट्रात रेल्वेमध्ये काम करत होते. ते २२ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते आपल्या पत्नीसह बीडी गावात स्थायिक झाले होते. या जोडप्याला मुले नव्हती. या प्रकरणी सायबर गुन्हे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Cyber Crime! ‘गुगल’वर सर्च केले हॉटेल अन् दोन लाखांची झाली फसवणूक…

पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…

एटीएम कार्ड बदलून खात्यातून पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक…

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

डिजिटल अरेस्टसाठी तोतया पोलिस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल अन् युवकाची शक्कल…

धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…

पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…

Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…

Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!