Video: हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांची काढली धिंड; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर, वैदुवाडी भागात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळक्यास हडपसर तपास पथकाकडून तात्काळ अटक करण्यात आली असून, गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची हडपसर पोलिसांनी धिंड काढली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यातील हडपसर भागात १८/१२/२०२३ रोजी रात्रौ २२:१५ ते २२:३० वाजताचे सुमारास फिर्यादी तानाजी मारुती खिलारे हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या परिसरात राहणारे मुलांनी हातामध्ये लोखंडी शस्त्रे घेवून येवुन फिर्यादी यांच्या भावाचा मुलगा विश्वास गणेश खिलारे याने अनिकेत पाटोळे, रवि पाटोळे, आदित्य पाटोळे व इतर अनोळखींविरुध्द १६/१२/२०२३ रोजी खडक पोलिस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन फिर्यादी यांना लोखंडी शस्त्राने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच घरासमोर पार्क मोटारसायकल व मोटार कारच्या काचा फोडल्या व इतर वस्तीमधिल ७-८ गाड्यांचे नुकसान केले. तसेच बेकरी व प्रोव्हिजन स्टोअर्सचे काउंटरच्या काचांची तोडफोड करुन त्यांचे नुकसान केले. आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवत कोणाला ही सोडु नका आडवा येईल त्याला मारा, कोणी मध्ये आल्यास त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याबाबत हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं १९१५ / २०२३ भादंवि कलम
३०७,३२४,४२७,१४३,१४४,१४५,१४८,१४९,५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ३७ (१), (३) सह १३५ प्रमाणे, आर्म अँ. ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून रविंद्र शेळेके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस स्टेशन, तपासपथक प्रभारी अधिकारी सहा पो. निरी विजयकुमार शिंदे, पोलिस उप-निरी. अविनाश शिंदे आणि तपासपथक अंमलदार यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेवून आरोपी
१) अनिकेत रविंद्र पाटोळे वय २३ वर्ष
२) आदीत्य रविंद्र पाटोळे वय २१ वर्ष
३) लखन बाळू मोहीते वय १९ वर्ष
४) तुषार बाळु मोहीते वय १८ वर्ष
५) हसनील अली सेनेगो वय १९ वर्ष
६) गौरव विजय झाटे वय १९ वर्ष
७) पंकज विठ्ठल कांबळे वय २१ वर्ष
८) ओंकार महादेव देडे वय २० वर्ष सर्व रा. वैदुवाडी / रामटेकडी हडपसर पुणे व ५ विधिसंघर्षीत बालक असे एकुण १३ जणांना
अटक / ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक महेश कवळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व आर राजा, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख, सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे), संदीप शिवले, पोनि.(गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलिस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव ,प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
हडपसर पोलिस आणि सामाजिक सुरक्षा विभागाची अवैध धंद्यांवर कारवाई…
हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला जप्त…
हडपसर तपास पथकाकडून अल्पवयीन मुले ताब्यात; घरफोडीचे गुन्हे उघड…
हडपसर पोलिसांना घरफोडी व वाहन चोरीचा गुन्हा उघड करण्यात यश…
हडपसर पोलिस स्टेशनची दोन महिन्यात दुसरी मोक्का अंतर्गत कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!