खाटिकानं मैत्रिणीला संपवलं अन् 9 तुकडे करत फेकले कालव्यात; पण…

अमरावती: एका खाटिकानं पैशाच्या वादातून महिलेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीनं तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते विजयवाडा येथील कालव्यात टाकले. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीनं विविध प्रयत्न केले. पण पोलिसांनी त्याला अटक केली. या हत्याकांडामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याणी असे मृत महिलेचे नाव आहे. इब्राहिमपुरामध्ये एक अज्ञात मृतदेह सापडला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. कल्याणीच्या कुटुंबियांनी तिच्या हातावर असलेला टॅटू पाहिला. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तेव्हा मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी कल्याणीच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांचा तपास भवानीपुरममध्ये मटणाचं दुकान चालवणाऱ्या शफी जवळ येऊन थांबला. शफी आणि कल्याणी यांचा परिचय होता. त्यांच्यात आर्थिक वाद होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. काही दिवसांपूर्वीच हा वाद अधिक चिघळला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शफी १७ सप्टेंबरला कल्याणीला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथेही त्यांच्यात वाद झाला. यानंतर शफीने कल्याणीवर सुऱ्यानं वार केले, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे.मटणाच्या दुकानात काम करणाऱ्या गुरुवुलूच्या मदतीनं शफीनं मृतदेहाचे ९ तुकडे केले. गोल्लापुडी परिसरातील कालव्यात तुकडे फेकण्यात आले, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी शफी आणि गुरुवुलू यांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. कल्याणीच्या हत्येमागील हेतू, गुन्ह्यातील दोघांची नेमकी भूमिका याचा तपास पोलीस करत आहे. संशयित आरोपींनी मृतदेहाची वाहतूक कशी केली, त्याची विल्हेवाट कशी लावली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, माध्यमांच्या सहकार्यामुळे गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याची माहिती इब्राहिमपुरा सर्कलचे निरीक्षक सुब्रमण्यम यांनी दिली. अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. पण सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानं कल्याणीच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…

पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…

मैत्रिणीला रंग लावला म्हणून प्रियकराने मित्राला रेल्वे रुळांवर जिवंत बांधलं अन्…

पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…

मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!