अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कारवाई…

नागपूर : माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते.

अनिल देशमुख हल्ला प्रकरणात चार अज्ञात आरोपींवर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले असून, फॅारेंसीक टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्था मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना रात्री नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे अनिल देशमुख यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा तपासासाठी पोलिसांनी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली असून चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दगडफेकीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. हा राजकीय स्टंट असावा असा आरोप भाजपच्या परिणय फुके यांनी केला. तर काही पण बरळणाऱ्या फुकेंसारख्या व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधिल नाही, असे प्रत्युत्तर सलील देशमुख यांनी दिले आहे.

अनिल देशमुख यांच्या गाडीवर तुफान दगडफेक, गंभीर जखमी, डोक्यातून रक्तस्त्राव…

बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून अटक

टपाली मतदान करताना फोटो काढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

नगरमध्ये मोठ्या शस्त्रसाठ्यासह 9 काश्मिरी युवकांना अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!