
बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू…
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (PA) अजित दशावतरे यांच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. या मुलीच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.
बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर परिसरातील एका ठिकाणी या अल्पवयीन मुलीचा मृतदेह अकस्मात आढळून आला. मुलीने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे, याबाबत अद्याप स्पष्टता होऊ शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि तिची आईमध्ये रात्री काही किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर मुलगी घरातून बाहेर पडली. बराच वेळ झाला तरी ती पुन्हा आली नसल्याने कुटुबीयांची काळजी वाढली. मुलगी राहत्या घरासमोरील एका इमारतीवर गेली होती.त्या इमारतीच्या टेरेसचा दरवाजा बंद असलेला आढळून आला आहे. इमारतीच्या कंपाउंडच्या बाहेर सुमारे १० ते १५ फूट अंतरावर या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे टेरेसचा दरवाजा या मुलीनेच लावला होता की हा घातपात आहे, याचा तपास होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक पाहणीत मुलीच्या शरीरावर जखमांच्या खूणा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुलीचा इमारतीवरून पडून अपघाती मृत्यू झाला, तिने आत्महत्या केली की तिची हत्या करून मृतदेह इमारतीबाहेर फेकून देण्यात आला? अशा सर्व शक्यतांच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास होण्याची शक्यता आहे.
स्वीय सहाय्यकाच्या मुलीच्या अकस्मिक मृत्यूची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (जीएमसी) धाव घेतली. तेथे पोहोचून त्यांनी या दुर्दैवी घटनेची सविस्तर माहिती घेतली असून, पोलिसांशीही चर्चा केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि पोलिसांचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. बारामती पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक तपास करत आहेत.
बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी; तलवारी, कोयते, लोखंडी रॉड अन्…
बारामती! भावकीच्या वादातून काकाने केली पुतण्याची हत्या…
बारामती! युवकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणारी मुलगी दहावीच्या परीक्षेत शाळेत आली पहिली…
बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून…

