पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना युनिट २ने केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): तंबाखू विक्री करणा-या व्यापा-यावर गोळीबार करणा-या मुख्य आरोपींना ०२ अग्निशस्त्रे, ३१ जिवंत काडतुसे व रोख रकमेसह युनिट २ ने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्वारगेट पोलिस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२३ भा.द.वि.क.३९७,३४ मधील आर्म अॅक्ट ३ (२५) महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ मधील गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना, गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, यातील मुख्य आरोपी हे बंगळूर येथे गेलेले आहेत. त्यांचा शोध घेणेकामी दोन टिम तयार करुन बंगळूर येथे रवाना केल्या. बंगळूर येथे सदर टिमने आरोपींचा शोध घेवून आरोपी हे चामरपेठ बंगळूर या परिसरात असल्याची माहिती प्राप्त केली. त्यांच्या शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसुन चौकशी केली.

१) अभय कुमार सुभोद कुमार सिंग वय २३ वर्ष धंदा हमाली रा मार्कटयार्ड पुणे मुळ रा रामदिरी गाव बुगुसरा मटिहाणी ठाणा बिहार राज्य
२) नितीश कुमार रमाकांत सिंग वय २२ वर्ष
अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांना सदर गुन्हयाच्या तपासकामी युनिट २, गुन्हे शाखा पुणे शहर येथे आणले असता त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी नमुद गुन्हयातील वापरलेले हत्यारे व हिसकावुन नेलेली रोख रक्कम पुण्यातील आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे येथील राहत्या घरी ठेवलेली असल्याचे सांगितले. या गुन्हयातील साथीदार मोहम्मद बिलाल तसुद हुसेन शेख (वय २९ वर्ष हा रा आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे) येथे असल्याचे सांगितले.

आरोपींकडून माहिती प्राप्त होताच आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे येथे सपोनि वैशाली भोसले, ०७ अंमलदार, तसेच पोउपनि नितीन कांबळे, ०४ अंमलदार, पोउपनि राजेद्र पाटोळे, ०४ अंमलदार अशा ०३ टिम आरोपींसह रवाना झाले. आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी वरील टिमने आरोपींच्या राहत्या घरी जावुन पाहणी केली असता दोन्ही आरोपी हे एकाच खोलीत राहत असल्याचे आढळून आले. त्यांचेसमक्ष त्यांच्या राहत्या खोलीची तपासणी केली असता, तपासणी मध्ये आरोपी क्रं १ याच्या पिशवीत एक पिस्टल, २० जिवंत काडतुसे व त्याच्या वाटणीस आलेले २,००,०००/- रु. (दोन लाख रुपये) असा मुद्देमाल मिळुन आला. तसेच आरोपी क्रं २ याच्या पिशवित त्याच्या वाटणीस आलेले १,२७,०००/-रु.(एक लाख, सत्तावीस हजार रुपये) मिळुन आले. तसेच त्यांचा साथीदार आरोपी क्रं ३) मोहम्मद बिलाल तसुद हुसेन शेख (वय २९, रा आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे) याच्या घरातुन १ गावठी कट्टा, ११ जिवंत काडतुसे व त्याच्या वाटणीस आलेले २५,०००/- रु.(पंचवीस हजार रुपये) हस्तगत करण्यात आले. असा एकुण २ अग्निशस्त्र, ३१ जिवंत काडतुसे व ३,५२,५००/- रु. रोख रक्कम मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींना स्वारगेट पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून पुढील अधिक तपास स्वारगेट पोलिस स्टेशन हे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा.पो.आयुक्त गुन्हे, सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट-२, पुणे शहर, नंदकुमार बिडवई सपोनि वैशाली भोसले, पोउपनि नितीन कांबळे, पोउपनि राजेंद्र पाटोळे, पोलिस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, उत्तम तारु, राहुल राजपुरे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, गणेश थोरात, अमोल सरडे, प्रमोद कोकणे, गजानन सोनुने,निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण व नागनाथ राख यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!