बीड हादरलं! युवकाचे अपहरण करून झाडाला बांधून बेदम मारहाण अन् मृत्यू…

बीड: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि मारहाणीच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. केज तालुक्यात युवकाचे अपहरण करत झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संबंधित युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अनैतिक संबंधाचे कारणातून ही मारहाण झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’

भाटूंबा येथे अनैतिक संबंधातून अण्णा उर्फ ज्ञानेश्वर धपाटे याचे अपहरण करत झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर धपाटे याला अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणात युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.

बीड! मुंडे गँगकडून मारहाणीनंतर अजित पवार प्रथमच परळीत…

बीड! परळीत मुंडे गँगकडून युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण, पाहा भयानक Video…

बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…

बीड! अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू…

बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार

बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!